एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : ब्लॉकबस्टर 'बाईपण भारी देवा'! 31 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने 70 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आता 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. महिला प्रेक्षकांना हा सिनेमा भावल्याचं पाहायला मिळत आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कार्यक्रम आणि कलाकृती महिलांनी डोक्यावर उचलून धरले आहेत. होम मिनिस्टर, माहेरची साडी, चिमणी पाखरं या सिनेमांच्या यादीत आता 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा समावेश झाला आहे. 

'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection)

सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या 31 दिवसांत 71.68 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 12.4 कोटी, दुसरा आठवडा 24.95 कोटी, तिसरा आठवडा 21.24 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 10.27 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 71.68 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने  रिलीज आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' सिनेमानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.

नागराज मंजुळेंच्या 'सैराट' या सिनेमाने 110 कोटींची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने 75 कोटींचा गल्ला जमवला होता. आता 'बाईपण भारी देवा' हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असून सैराट आणि वेड यांच्या तोडीसतोड असल्याचं पाहायला मिळत आहे.

'बाईपण भारी देवा' या सिनेमात  रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi),वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone),शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) , सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि दीपा परब (Deepa Parab) अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदेंच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी सिनेमाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून आलं.

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची हवा; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget