Badshah Song Controversy : 'सनक' गाण्यामुळे बादशाह अडकला वादाच्या भोवऱ्यात; पोस्ट शेअर करत मागितली माफी, घेतला 'हा' निर्णय
काही दिवसांपूर्वी बादशाहचं (Badshah) सनक हे गाणं रिलीज झालं. या गाण्याच्या लिरिक्समुळे बादशाह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Badshah Song Controversy : प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी बादशाहचं सनक हे गाणं रिलीज झालं. या गाण्यावर अनेक नेटकऱ्यांनी रिल्स केले. या गाण्यातील लिरिक्समुळे बादशाह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता या बादशाहनं एक पोस्ट शेअर करुन या चाहत्यांची माफी मागितली आहे.
बादशाहनं शेअर केली पोस्ट
बादशाहनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांची माफी मागितली आहे. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'माझ्या निदर्शनास आले आहे की माझ्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सनक या गाण्यानं काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कधीही जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावणार नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने माझी कलात्मक निर्मिती आणि संगीत रचना तुमच्यासमोर आणत आहे. मी माझ्या गाण्यांचे काही भाग बदलले आहेत. कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर या गाण्याचे नवे व्हर्जन रिलीज करण्यात येईल. तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा ही नम्र विनंती. ज्यांच्या भावना मी नकळत दुखावल्या असतील त्यांची मी विनम्रपणे माफी मागतो. माझे चाहते हेच माझे आधारस्तंभ आहेत आणि मी त्यांचा आदर करतो.लव्ह बादशाह'
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बादशाहच्या गाण्यावरून वाद निर्माण झाला. बादशाहनं त्याच्या या नव्या गाण्यात महादेवाच्या नावाचा वापर केला, ज्यामुळे महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी बादशाहला फटकारले होते.
View this post on Instagram
बादशाह गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. डीजे वाले बाबू, लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. बादशाह हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. त्याच्या आगामी गाण्यांची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर त्याला 12.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. बादशाहच्या आगामी गाण्यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Badshah Wedding : रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात