Badhaai Do : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'बधाई दो' सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'बधाई हो' सिनेमाचा सिक्वेल
Badhaai Do : 'बधाई दो' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' सिनेमाचा सिक्वेल आहे.
Badhaai Do : राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या 'बधाई दो' (Badhai Do) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा सिनेमा सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित होणार असल्याचेही या पोस्टरच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राजकुमार राव एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. ट्रेलर मंगळवारी 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आयुष्मान खुरानाच्या 'बधाई हो' सिनेमाचा सिक्वेल
राजकुमार रावने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे,"या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे".
View this post on Instagram
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या 'बधाई हो' सिनेमाचा 'बधाई दो' हा सिक्वेल असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले होते. 'बधाई हो' सिनेमा त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. हा सिनेमा आधी 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे. हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून विनीत जैन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
संबंधित बातम्या
Aditya Narayan : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच होणार बाळाचं आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!
john Abraham : चाहत्यानं केलेल्या कृत्यामुळे जॉन भडकला; लगावली कानशिलात
Gehraiyaan song Doobey : ‘गेहरांईया’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘डुबे’मध्ये दिसला दीपिकाचा बोल्ड अंदाज!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha