Badhaai Do New Song : 'बधाई दो' सिनेमातील 'अटक गया' गाणे रिलीज, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार प्रदर्शित
Badhaai Do : समलैंगिक जोडप्यांच्या प्रेमकहाणीवर भाष्य करणारा 'बधाई दो' सिनेमा आहे.
Badhaai Do New Song : 'बधाई दो' (Badhaai Do) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे. 'अटक गया' असे या गाण्याचे नाव आहे. हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. हे गाणं वरुण ग्रोवरने लिहिले असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केले आहे. तर अरिजीत सिंह आणि रुपाली मोघेने हे गाणं गायले आहे.
सुंदर बीट्स, मधुर शब्द आणि सामर्थ्यशाली व्हिज्युअल्सच्या मिश्रणासोबत, हे गाणे सर्व लव्हबर्ड्ससाठी एक परिपूर्ण ट्रीट आहे. हे गाणे शार्दुल (राजकुमार राव) आणि सुमीच्या (भूमी पेडणेकर) अतरंगी लग्नाचे वर्णन करते. या गाण्याचे बोल वरुण ग्रोवर, वायु, अनुराग भोमिया, अजीम शिराझी आणि अन्विता दत्त यांनी लिहिले आहेत.
कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणीवर सिनेमा भाष्य करणार आहे. सिनेमात राजकुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून भूमी पेडणेकर पीटी शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात सीमा पाहवा, शीबा चढ्ढा आणि लवलीन मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हर्षवर्धन कुलकर्णीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या 'बधाई हो' सिनेमाचा 'बधाई दो' हा सिक्वेल असणार आहे.
संबंधित बातम्या
Sunil Grover Heart Surgery : अभिनेता सुनील ग्रोव्हरवर हृदय शस्त्रक्रिया, कॉमेडियनची प्रकृती स्थिर
Bhool Bhulaiyaa 2: ‘RRR’शी टक्कर टळली, कार्तिक-कियाराचा ‘भूल भुलैया 2’ आता ‘या’ दिवशी होणार रिलीज!
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पूर्व तयारीला सुरुवात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha