(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anushka Shetty Suffers from Rare Disease : काय सांगता अनुष्काला झालाय दुर्मिळ आजार; अचानक मध्येच थांबवावी लागते शुटिंग
Anushka Shetty Suffers from Rare Disease : अनुष्का शेट्टीने नुकतंच आपल्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक माहिती सांगितली आहे. अनुष्का ही एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे.
Anushka Shetty Suffers from Rare Disease : बाहुबली फेम दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीची (Anushka Shetty) लोकप्रियता हिंदी आणि अन्य प्रादेशिक चित्रपटप्रेमींमध्ये आहे. बाहुबलीमुळे दाक्षिणात्या सिनेसृष्टीबाहेर प्रभासची मोठी क्रेझ निर्माण झाली. मात्र, अनुष्का शेट्टीची लोकप्रियता ही बाहुबलीच्या आधीपासून आहे. अनुष्काने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुष्का शेट्टीने नुकतंच आपल्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक माहिती सांगितली आहे. अनुष्का ही एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे. या आजारपणामुळे शूटिंगमध्ये थांबवावे लागत आहे. पुन्हा ठीक होण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा अवधी लागतो. त्यानंतर शूटिंग सुरू होते.
अभिनेत्रीने सांगितले मनातलं दु:ख
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान याविषयी बोलताना अनुष्का शेट्टीने सांगितले की, मला हसण्याचा आजार आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हसणे हा देखील एक आजार असू शकतो. पण माझ्या बाबतीत तसंच आहे. एकदा मी हसायला लागलो की 15-20 मिनिटे हसणे थांबवणे माझ्यासाठी कठीण होते. कोणताही कॉमेडी सीन पाहताना किंवा शूट करताना मी हसत हसत जमिनीवर लोळते. यामुळे शूटिंग थांबवावे लागल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
View this post on Instagram
काय आहे हा दुर्मिळ आजार?
अनुष्काच्या मते, तिला स्यूडोबुलबार इफेक्ट (Pseudobulbar Affect) म्हणजेच पीबीए नावाचा आजार आहे. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. या अवस्थेत व्यक्ती एकतर अनियंत्रितपणे हसायला लागते किंवा रडायला लागते. अभिनेत्रीने तिला या आजाराने ग्रासले असल्याचे सांगितले नसले तरी तिच्या वक्तव्यावरून असे मानले जात आहे की अभिनेत्रीलाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे.
मागच्या वेळी ती मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी नावाच्या चित्रपटात दिसली होती. सध्या अनुष्का ही घाती आणि कथानार या चित्रपटात काम करत आहे.
आजाराचे निदान होणे आव्हानात्मक
पीबीएचे निदान करणे आव्हानात्मक असू शकते, कारण त्याची लक्षणे सहसा इतर भावनिक किंवा मानसिक विकार जसे की नैराश्य किंवा चिंता यांच्याशी ओव्हरलॅप होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. एका संशोधनानुसार, ज्या रुग्णांनी त्यांच्या हसण्याच्या किंवा रडण्याबाबत त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा केली त्यांच्यापैकी फक्त 41 टक्के निदान झाले.