Baahubali 3 : पिक्चर अभी बाकी हैं... बाहुबली 3 संदर्भात मोठी अपडेट; 'कंगुवा'च्या निर्मात्याचा खुलासा
Baahubali 3 Update : बाहुबली 3 चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कंगुवाच्या निर्मात्याने मोठा खुलासा केला आहे.
Baahubali 3 Update : एस.एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटाने भारतीय सिनेमामध्ये एक नवीन पायंडा रचला. या फ्रेंचायझीचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. बाहुबली चित्रपटामुळे भारतीय सिनेमाला जगभरात पुन्हा एक नवी ओळख मिळाली. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शन, वीएफएक्स, पटकथा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं. बाहुबली 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतरच बाहुबली 3 चित्रपटाची चर्चा सुरु झाली होती. आता बाहुबली चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कंगुवा चित्रपटाच्या निर्मात्याने मोठा खुलासा केला आहे.
बाहुबली 3 संदर्भात मोठी अपडेट
बाहुबली चित्रपटामुळे अभिनेता प्रभास याला खरा स्टारडम मिळाला. अनुष्का शेट्टी, राणा दगुब्बती, राम्या कृष्णन या कलाकारांनाही या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवून दिली. बाहुबलीचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या भागाची लोक प्रतीक्षा करत होते, त्यानंतर बाहुबलीचा दुसरा भाग रिलीज झाल्यानंतरही बाहुबली तिसऱ्या भागाचीही उत्कंठा निर्माण झाली होती.
कंगुवा चित्रपटाच्या निर्मात्याचा खुलासा
अभिनेता सूर्याचा आगामी कंगुवा चित्रपटाचा निर्माता के.ई. ज्ञानवेल राजा याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाहुबली 3 चित्रपट सध्या प्लॅनिंगच्या टप्प्यात आहे. गेल्या आठवड्यात चित्रपट निर्मात्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान मला याची माहिती मिळाली. बाहुबली 1 आणि बाहुबली 2 बॅक टू बॅक बनवल्यानंतर आता ते बाहुबली 3 चित्रपट बनवण्याची योजना करत आहेत.'
बाहुबली 3 बद्दल प्रभासची प्रतिक्रिया
दरम्यान, के.वी. विजयेंद्र प्रसाद यांनी 'बाहुबली 3' च्या शक्यतांवर ब्रेक लावला होता. 2017 मध्ये, ज्येष्ठ पटकथा लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाबद्दल बोलले आणि 'बाहुबली 3' चित्रपटाची शक्यता नाकारली होती. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, प्रभासने बाहुबली 3 ची शक्यता नाकारली होती. यावेळी प्रभासने म्हटलं होतं की, 'आम्ही बाहुबलीची कथा पूर्ण केली आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग असू शकत नाही, पण बाहुबलीचा वारसा कॉमिक सीरीज आणि टीव्ही मालिकांमधून जिवंत राहील.
आता, निर्माता ज्ञानवेल राजाने 'बाहुबली' चित्रपटाच्या चाहत्यांच्या हृदयातील इच्छेला आशेचा किरण दिला आहे. प्रभासला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बाहुबलीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. बाहुबली चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, तरीही या चित्रपटाची अपडेट येईल या आशेने प्रेक्षक एस.एस. राजामौली यांच्याकडे डोळे लावू बसले आहेत. दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या महेश बाबूसोबत त्याच्या पहिल्या प्रोजेक्ट 'SSMB 29' चित्रपटामध्ये व्यस्त आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :