एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर बाहुबली-2चे नवे पोस्टर रिलीज

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'बाहुबली: द कनक्ल्यूजन'चे दुसरे पोस्टर आज रिलीज झाले आहे. हे नवे पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियातून चांगलीच पसंती मिळत आहे. या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत.
गेल्या वर्षी बहुबली सिनेमाच्या पहिल्या भागातील कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने अनेकांचे डोके खाल्लं होतं. यानंतर यावरुन सोशल मीडियातून जोकची मालिकाही सुरु झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची उत्कंठा लागून आहे. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून, हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या सिनेमाची कॉपी लिक होऊ नये म्हणून दिग्दर्शकाने सिनेमाचा क्लायमॅक्स चार भागात शूट केला आहे. यातील कोणता भाग सिनेमाच्या मुख्य कॉपीत असेल हे जरी सांगितले जात नसले, तरी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. बाहुबलीचा पहिला भाग सहा भाषांमध्ये रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे आता दुसरा भाग ही तशाच प्रकारे इतरही भाषांमध्ये रिलीज करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.On this Republic Day, presenting to you Amarendra Baahubali & Devasena! #WKKB #BAAHUBALI2 pic.twitter.com/uu7JPS8I0t
— Baahubali (@BaahubaliMovie) January 26, 2017
आणखी वाचा























