(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra : अयान मुखर्जीनं सांगितला 'ब्रह्मास्त्र'चा दहा वर्षांचा प्रवास; शेअर केला खास व्हिडीओ
ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) केलं आहे.
Brahmastra : लवकरच ब्रह्मास्त्र (Brahmastra) या बहुर्चित चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt),अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), मौनी रॉय (Mouni Roy),नागार्जुन (Nagarjun), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) केलं आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अयाननं या चित्रपटाच्या निर्मितीबाबत माहिती दिली आहे.
स्टार स्टुडिओच्या यूट्यूब चॅनल वरुन अयाननं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अयान हा ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निर्मितीबाबत माहिती देताना दिसत आहे. व्हिडीओमधून अयाननं या चित्रपटाच्या दहा वर्षाच्या प्रवासाची माहिती दिली आहे.
काय म्हणाला अयान मुखर्जी?
'2011 मध्ये ब्रह्मास्त्राच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. त्यादरम्यान माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि मी दुसऱ्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होतो. त्या काळात मी शिमला येथे होतो. ब्रह्मास्त्र चित्रपट हा आपली संस्कृती, पौराणिक कथा आणि भारतातील अध्यात्म यावर आधारित आहे. या चित्रपटाची लेव्हल एवढी मोठी होती की, ती एका सिनेमात पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मी हा चित्रपट तीन भागांमध्ये तयार करण्याचा निर्णय घेतला. 'द ट्रायोलोजी' अशा तीन भागांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाची निर्मिती करायचं आम्ही ठरवलं होतं. पण एवढ्या मोठ्या स्केलमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मी नव्या प्रकारची फिल्म मेकिंग शिकलो. बराच रिसर्च मी केला.'
पाहा व्हिडीओ:
'ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2017मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना आलिया आणि रणबीरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
वाचा इतर बातम्या: