एक्स्प्लोर

Avatar 2 Box Office Collection: 'अवतार द वे ऑफ वॉटर' ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; सहाव्या दिवशी केली एवढी कमाई

'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) ने बुधवारी (21 डिसेंबर)  सहाव्या दिवशी किती कमाई केली? ते जाणून घेऊया.

Avatar 2 Box Office Collection:  अवतार द वे ऑफ वॉटर  (Avatar The Way Of Water) म्हणजेच (Avatar 2)  हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले. चित्रपटातील  VFX आणि कथा यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' ने बुधवारी (21 डिसेंबर)  सहाव्या दिवशी किती कमाई केली? ते जाणून घेऊया.

पहिल्या वीकेंडच्या तुलनेत वीक डेमध्ये चित्रपटाच्या कमाईतही घट झाली तरी 'अवतार 2'चे कलेक्शन खूपच चांगले आहे.  पहिल्या दिवशी चित्रपटाने 40.3 कोटींची कमाई केली आहे. दुस-या दिवशी चित्रपटाने 42.5 कोटी कमावले तर तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 46 कोटींवर पोहोचला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 18.6 कोटींची कमाई केली आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर'ने मंगळवारी 16.5 कोटींचा व्यवसाय केला. आता चित्रपटाच्या बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवसाचे कलेक्शन पाहूयात- 

रिपोर्टनुसार, ‘अवतार द वे ऑफ वाटर’  या चित्रपटानं बुधवारी 15.25 कोटींची कमाई केली. आता अवातरचे एकूण कलेक्शन 179 कोटी एवढे झाले आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' भारतात 3800 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असं म्हटलं जात आहे. 

'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमात प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सॅम वर्थिंग्टन  जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.  तसेच जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Elections Phase 1 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण, राज्यात किती टक्के मतदान?Nashik Lok Sabha : भुजबळ गेले बोरस्ते आले...हेमंत गोडसे यांची आव्हानं संपेना ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Rahul Shewale : राहुल शेवाळे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, चर्चा काय झाली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Embed widget