एक्स्प्लोर
''चिंकारा मारणाऱ्या सलमानला महापालिका स्वच्छता दूत कशी बनवू शकते?''
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेल्या दशावताराचा रोज नवीन अंक मुंबईकरांना पाहायला मिळतोय. त्यातच आता मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
चिंकारा मारणाऱ्या सलमान खानची मुबंई महापालिका ब्रँड अँबेसिडर म्हणून कशी नियुक्ती करू शकते, असा सवाल विचारून आशिष शेलारांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई महपालिकेने स्वच्छता दूत म्हणून सलमान खानची नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेलारांनी ही टीका केली. स्वच्छतेविषयी जागरुती करण्यासाठी सलमान खानची महापालिकेने नियुक्ती केली आहे. मात्र यावरुन शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement