एक्स्प्लोर

'त्या' दिवशी स्मृती इराणींनी माझी सुटका केली, आशा भोसलेंकडून आभार

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर उसळलेल्या गर्दीतून आपली सुटका केल्याबद्दल ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे ट्विटरवरुन आभार मानले आहेत.

मुंबई : गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी नवनिर्वाचित केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर गर्दीतून आपली सुटका केल्याबद्दल आशा भोसलेंनी स्मृती यांचे ट्विटरवरुन आभार मानले आहेत. 'पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर वेड्यासारखी गर्दी उसळली आणि मी अडकले. कोणीही माझ्या मदतीला आलं नाही, मात्र स्मृती इराणी माझी सुटका करण्यासाठी धावून आल्या. त्यांना माझी दैना समजली. मी घरी सुखरुप पोहचेन, याची त्यांनी खात्री बाळगली. त्यांना काळजी आहे म्हणून त्या जिंकल्या' असं ट्वीट आशा भोसले यांनी केलं आहे. स्मृती इराणी यांना मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा 55 हजार 120 मतांनी पराभव करत स्मृती जायंट किलर ठरल्या होत्या. काँग्रेसचा बालेकिल्ला खालसा करणाऱ्या स्मृती यांना केंद्रात मोठं मंत्रिपद मिळणं निश्चित होतं. अमेठी विजयानंतर स्मृती इराणी मुंबईतील निवासस्थानापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत 14 किलोमीटर अनवाणी चालत गेल्या होत्या. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला रजनीकांत, शाहीद कपूर, करण जोहर, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, बोनी कपूर, मधुर भांडारकर, अनुपम खेर, कपिल शर्मा यासारख्या बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. राजकारण, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: 'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
Snehal Tarde On Deool Band 2: 'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं
'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
Gold Reserve : रिझर्व्ह बँकेने त्यांच्याकडील सोन्याचा साठा विकला? RBI कडे किती सोने? मोठी आकडेवारी समोर
रिझर्व्ह बँकेने त्यांच्याकडील सोन्याचा साठा विकला? RBI कडे किती सोने? मोठी आकडेवारी समोर
आधीच टंचाई, त्यात डिझेलचा टँकर पलटी; अपेक्षेप्रमाणे ड्रम, बॅरेल घेऊन लोकांची घेऊन गर्दी, पोलिस घटनास्थळी दाखल
आधीच टंचाई, त्यात डिझेलचा टँकर पलटी; अपेक्षेप्रमाणे ड्रम, बॅरेल घेऊन लोकांची घेऊन गर्दी, पोलिस घटनास्थळी दाखल
ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
ST Bus Accident In Gujarat: आमचे नातेवाईक कुठे, जिवंत आहेत का?; शवागारबाहेर हंबरडा आणि आक्रोश; गुजरातमधील एसटी अपघातानंतर अंगावर काटा आणणारं दृश्य
आमचे नातेवाईक कुठे, जिवंत आहेत का?; शवागारबाहेर हंबरडा आणि आक्रोश; गुजरातमधील एसटी अपघातानंतर अंगावर काटा आणणारं दृश्य
शिवसेनेचं बंड शमलं, जुईली दळवींचा अर्ज मागे; एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर उतरलं; अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
शिवसेनेचं बंड शमलं, जुईली दळवींचा अर्ज मागे; एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर उतरलं; अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
Vidhan Parishad Election 2026 : अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
Embed widget