एक्स्प्लोर

या कबीर सिंहचं करायचं काय?

गाडीला गाडी टेकली तरी पूर्वी ' अरे काय यार' असं गाडीत बसूनच नाराजी नोंदवणारे आपण, उठून समोरच्याच्या कानशिलात भडकावू लागलोय. आनंद, राग, संताप, शोक हे सगळं आतातायीपणे सेलिब्रेट करायची सवय आपल्याला लागली आहे. सुट्टे नाहीत म्हणून.. भाडं नाकारलं म्हणून.. केवळ आपल्याकडे पाहिलं म्हणून.. आईबाबांनी मोबाईल दिला नाही म्हणून.. मरण्याचं-मारण्याचं प्रमाण वाढलं आहे. कबीर हे त्या उतावीळ मानसिकतेचं लार्जर दॅन लाईफ स्वरुप आहे.

कबीर सिंग प्रदर्शित झाला. त्याने जवळपास शंभर कोटी पार केल्यानंतर त्या चित्रपटातल्या कबीरच्या व्यक्तिरेखेबद्दल अनेक शंका-तक्रारी-वाद सुरु आहेत. कबीर सिंगमधल्या जवळपास सर्वच स्त्रियांचा आवाज दाबला गेल्याची भावना काहींनी बोलून दाखवली आहे. या सिनेमात कबीरने नायिकेसह तिच्या वयाच्या सर्वच महिला व्यक्तिरेखांना कसं भोग्य वस्तू मानलं आहे, अशा स्वरुपाचा सूर आला आहे. मी माझ्या फेसबुकवरच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे, 'कबीर सिंह'चं बॉक्स ऑफिसवरचं यश हे 'पिंक'चं अपयश आहे असंही बोललं जातं आहे. कबीर सिंह आणि पिंक हे चित्रपट कसे आहेत, यावर आपण आत्ता नको बोलूया. कारण तो आजचा विषय नाही.
एक लक्षात घ्यायला हवं की कबीर सिंग हा पूर्णत: मसालापट आहे. या प्रकारच्या सिनेमांमध्ये व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाईफ, लाऊडर दॅन लाईफ दाखवण्याचा हट्ट असतो. महणूनच टिपीकल दक्षिणी चित्रपटावर नजर टाकली तर त्या चित्रपटाच्या नायकापेक्षा नकारात्मक वाटणारा खलनायक कित्येक पटींनी क्रूर असतो. तो महिलांचा अनन्वित छळ करतो. निरागस छोट्या मुलांनाही मारतो. खून, बलात्कार तर त्याच्या डाव्या हाताचा खेळ असतो. पोलिसांना ठार मारतो.. मग तो खलनायक पेशाने पोलीस, डॉक्टर, नेता, उद्योगपती असा कोणीही असला तरी चालतो. याची कारणं दोन असतात. एक तर तो मसाला मुव्ही आहे. म्हणजेच ते खोटं असतं. मनाला फार लावून घ्यायचं नसतं हे आपण मान्य केलेलं असतं आणि दुसरं कारण असं की काही झालं तरी आपला हिरो या नालायक प्रवृत्तीचा नायनाट करणार असतो. त्यामुळे सरतेशेवटी डोक्याला कोणताही शॉट नसतो.
आता हीच लाऊडर दॅन जनरल लाईफ वृत्ती नायकाची केली तर? म्हणजे याच वृत्तीला नायक केलं तर काय होईल? तर त्याचा अर्जुन रेड्डी अर्थात कबीर सिंग बनतो. म्हणजे, यातला नायक कमालीचा जीनिअस आहे. टॉपर आहे. ऑलराऊंडर आहे. म्हणजे नायकाचे सगळे गुण त्याच्यात आहेत. पण त्याचवेळी तो सणकी आहे. वेडसर आहे. बेधडक, बिनधास्त आहे. शीघ्रकोपी आहे. असभ्य, स्वैराचारी आहे. म्हणजे, हा चित्रपट बनवताना दिग्दर्शकाने सगळ्या आतर्क्य गोष्टी एका नायकाच्या व्यक्तिमत्वात घातल्या आहेत. आता एकदा एक कॅरेक्टर डिफाइन झाल्यानंतर संपूर्ण चित्रपटभर ते कॅरेक्टर त्याच पद्धतीने वागताना बोलताना दिसतं. हे सिनेमाचं व्याकरण आहे.
एक पाहा, की चित्रपटात कबीरच्या या शीघ्रकोपी स्वभावाचं समर्थन झालेलं नाहीच. कारण कॉलेजचा डीन कबीरला वर्गात बोलावून फळ्यावर मोठ्ठा शून्य काढतो त्यावेळी रागाच्या व्यवस्थापनही कसं आवश्यक आहे हेही सांगतोच. कबीरसारखं कसं असू नये हेच तो संगतो आहे. हा डिस्क्लेमर दिग्दर्शकाने डीनच्या तोंडी घातला आहे. मुळात व्यवहारी जगात कबीरच्या अतरंगी मानसिकतेचं समर्थन कोणीच करणार नाही. पण एकदा एका मसालापटामध्ये आमचा नायक 'असा' आहे असं सांगितलं की तो त्याचपद्धतीने वागणार आणि बोलणार हे उघड आहे. कारण तो तद्दन व्यावसायिक चित्रपट आहे. हाऊसफुल्ल, गोलमाल, बागी, मुन्नाभाई, हिरोपंती, सिंघम,  दे दे प्यार दे असे कैक सिनेमे जसे आपण बघून सोडून देतो त्याच पठडीतला हा सिनेमा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी दक्षिणेत आला. तोबा चालला. तिथे त्यावेळी अशा तक्रारी झाल्याचं ऐकीवात नाही. तिथलं व्यावसायिक यश लक्षात घेऊन तो चित्रपट हिंदीत आला. आज सेन्सॉर सर्टिफाईड कॉपी थिएटरमध्ये आहे. आता अडचण काय?
चित्रपटाबाबत बोलायचं तर, ती एक काल्पनिक गोष्ट आहे. कबीर परिणामांची चिंता करत नाही. त्याला जे वाटतं ते तो करतो. तो स्वत:च्या मताशी प्रमाणिक आहे. तो कुणावरही जोर-जबरदस्ती करत नाही. त्याच्या त्याच्या ज्या गोष्टी आहेत मग ती गर्लफ्रेंड असो, घरातला पाळीव कुत्रा असो किंवा ग्लास.. त्याचंं त्या गोष्टींवर तितकंच प्रेम आहे. मग त्याच्या जपणुकीसाठी तो कोणत्याही थराला जातो. असं एकदा कॅरेक्टर आल्यानंतर कबीर तसाच वागणार. तिथे फेमिनिस्ट दृष्टिकोन बाळगणं हे व्यक्तिगत पातळीवर अनाकलनीय आहे.
त्यांच्याबाबत आलेले ढोबळ आक्षेपार्ह मुद्दे असे, 
* सुरुवातीला कबीर शरीरसुखासाठी मुलीला चाकूचा धाक दाखवतो.
* कबीरला एक मुलगी पाहताक्षणी आवडल्यावर तिच्यावर तो आपला हक्क दाखवू लागतो.
* एका सिनेअभिनेत्रीलाही कबीर थेट शरीरसुखाची मागणी घालतो.
* ती अभिनेत्रीही त्याचे कपडे इस्त्री करते.
* चित्रपटाची नायिका, इतर स्त्री कलाकार यांच्यावर कबीर हक्क गाजवतो. अर्वाच्च शब्दात भांडतो.
* लग्नाची मागणी घालायला गेल्यानंतर नायिकेने आग्रह करुनही तो तिला सहा तासांची मुदत देऊन निघतो.
* चित्रपटातलं कोणतंही स्त्री पात्र तिच्या मनातलं बोलत नाही. उलट पुरुष जे सांगेल ते ते फॉलो करताना दिसतं.
ही काही उदाहरणं झाली.अशा अनेक मुद्द्यांवर स्त्रीवादी मंडळींना आक्षेप आहेत. पण हे सभ्यतेचे, मानवतेचे निकष आपण वास्तवदर्शी चित्रपटांना लावू शकतो. पण एकदा हा धंदेवाईक चित्रपट आहे हे मान्य केल्यानंतर तो केवळ मनोरंजन म्हणून हा चित्रपट पाहाणं कधीही इष्ट.
आता मुद्दा असा, की ती नायिका जर डॉक्टरकी करते आहे तर ती इतकी घुमी, शांत कशी? तिला तिची मतं नाहीत का? चित्रपटाच्या नायकाने तिला इतकं का दाबून टाकलं आहे? हे असे प्रश्न मनात येणंही साहजिक आहे. सिनेमा पाहताना ते माझ्या मनातही येतात. माझ्या समीक्षेतही मी म्हटल्याप्रमाणे तो पटकथेचा दोष आहे.
जरा नीट समजून घेऊ. 
हा चित्रपट मूळचा दक्षिणी. त्याचं हिंदीकरण करताना नायिकाही मूळ दक्षिणी चित्रपटाप्रमाणेच दाखवण्यात आली आहे. पण पटकथेमध्ये कबीर प्रितीला लग्नाची मागणी घालायला जातो तेव्हा, तिची आई म्हणते, की 'तिचे बाबा बाहेर गेलेत. ते येतील मगच आम्ही प्रीतीच्या लग्नाचा निर्णय घेऊ. तू आत्ता बस. हे येतीलच एवढ्यात. सगळे निर्णय आम्ही मिळून घेतो.'  आता ज्या घरात मिळून निर्णय घेतले जातात तिथे वाढणारी मुलगी इतकी रिजर्व माईंडेड कशी असू शकते? हा लॉजिकचा घोळ आहे हं. इथेही जर 'आमच्या घरातले सगळे निर्णय तिचे बाबाच घेतात,' असा संवाद असता तर तिचं गप्प बसणं.. वडीलधारी असलेल्या नायकाच्या मागेमागे जाणं लॉजिकल झालं असतं. पण मिळून निर्णय घेणाऱ्या घरात इतकी घुमी मुलगी हे जरा न झेपणारं आहे. म्हणजे मलाही तिच्या शांत असण्यावर आक्षेप आहे. पण तो पटकथेच्या, कॅरेक्टरच्या लॉजिकचा मुद्दा आहे. असो.
आता कबीरच्या वर्तणुकीवरही आक्षेप घेतले गेले आहेत. तो प्रोफेशनल डॉक्टर असून दारु पिऊन ऑपरेशन करतो. दाढी वाढवून ऑपरेशन थिएटरमध्ये जातो हे कसं प्रोफेशनच्या बाहेरचं आहे असं बोललं जातं आहे. वास्तवात हे आक्षेप योग्य असतीलही. जे अगदीच खरं आहे. पण मग तो नियम आपण सगळीकडेच लावला तर मसालेदार सिनेमे बनायचे बंद होतील हो. म्हणजे यापूर्वीही खाकी वर्दीची सगळी बटणं उघडून नौटंकी करणारे नायक पांढरे बनियन दाखवत. केस खांद्यापर्यंत झुलवत ठेवून पान खान पोलिस स्टेशनमध्ये बसलेले पोलिस बऱ्याचदा दिसलेत. डॉक्टरकीच्या परीक्षेत कॉपी करुन डॉक्टरकी करणारा मुन्नाभाईही आपण डोक्यावर घेतलाच की. पोरींची लफडी करणारे नेते, भ्रष्ट उद्योगपती इतकं कशाला मोहरा, आन, वॉण्टेड आदी चित्रपटांमध्ये पोलिस कसे भ्रष्ट आहेत हे दाखवलं आहेच. मग इथे तर सगळ्याच इमेजचा चुराडा झाला आहे. तरीही आपण ते पाहतो कारण तो चित्रपट आहे. हा सिनेमा फार डोक्यापर्यंत न्यायचा नसतो, हे आपण ठरवलेलं आहे.
त्याचवेळी काही वर्षांपूर्वी आलेल्या बाजीराव मस्तानी, पद्मावत आदीं चित्रपटांवर आक्षेप घेतले गेले. दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टीचं यावेळी समर्थन केलं होतं. तरीही आक्षेपांचे मुद्दे विचारात घेतले गेले कारण ते चित्रपट ऐतिहासिक घटनांवर, व्यक्तिरेखांवर बेतलेले होते. कबीर सिंग असा कोणताही दावा करत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.
कबीर पाहून बाहेर पडलेल्या मुलींना तुम्हाला सिनेमा आवडला का आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कबीर आला तर त्याच्याशी लग्न कराल का असं विचारल्यावर मुलींनी सॉर्टेड उत्तर दिलं. त्यांना सिनेमा आवडला. पण असा नवरा काही आपल्याला नको असं त्यांचं म्हणणं, जे अगदीच योग्य आहे.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कबीर वेडसर आहे. आक्रमक आहे. पण त्याच्या काही प्रमाणिक बाजूही या सिनेमात दिसतात. इथे कबीरचे काही सॉर्टेड पैलूही पाहायला मिळतात. आज फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकून हळूहळू मैत्री करत भलते हेतू मनात ठेवणारे बहाद्दर आपल्याकडे कैक आहेत. लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याची उदाहरणं तर रोज आपण प्रसारमाध्यमात पाहात असतो. मग त्यापेक्षा सिनेनायिकेला पहिल्या भेटीत आपल्या ब्रेकअपबद्दल सांगून फिजिकल हेल्प मागणारा कबीर जास्त खरा नव्हे काय? ते सांगून फिजिकल होऊ पाहणारी सिनेअभिनेत्री जेव्हा कबीरला आय लव्ह यू म्हणते त्यावेळी दुसऱ्या सेकंदाला त्या नात्यातून बाहेर पडणारा कबीर फसवा वाटत नाही. सुरुवातीच्या कॉलेजच्या फुटबॉल मॅचनंतरच्या प्रसंगात आपली चूक नसल्यामुळे माफी न मागता तुम्ही या कॉलेजचे आहात. पण हे कॉलेज माझं आहे, असं डीनला छातीठोकपणे सांगणारा कबीर सॉर्टेड आहे. प्रचंड नशापाणी करुनही शेवटी आपल्या प्रोफेशनला जागून ऑपरेशन करणारा कबीर सध्या समाजात सुळसुळाट झालेल्या लुटारु डॉक्टरपेक्षा जास्त जवळचा वाटतो.
तर आता मुद्दा असा की आपण यातून काय घ्यायचं? कबीर चांगला की वाईट? तर हा मुद्दाच इथे येत नाही. कारण कबीरला एका पॉईंटनंतर डोक्यात ठेवायचं नसतं. केवळ रंजन करणं याच उद्देशाने हा चित्रपट बनवला आहे.
या सिनेमाला आपण इतकं सीरिअसली घ्यायचंच नसतं. कबीर सिंग हा तद्दन मसालापट आहे. तो बघायचा. आवडला तर ठीक. नाहीतर सोडून द्यायचा.
कबीरवर तरुणाईच्या उड्या पडतायत हे ढळढळीत सत्य आहे. आपण उलटा विचार करून पाहू. का चालला असेल कबीर? कबीरच्या आतर्क्य शीघ्रकोपी उतावळेपणात त्याचं यश लपलं आहे. आज आपल्या सगळ्यांची सहनशीलता, संयम अत्यंत कमी होत चालला आहे. गाडीला गाडी टेकली तरी पूर्वी ' अरे काय यार' असं गाडीत बसूनच नाराजी नोंदवणारे आपण, उठून समोरच्याच्या कानशिलात भडकावू लागलोय. आनंद, राग, संताप, शोक हे सगळं आतातायीपणे सेलिब्रेट करायची सवय आपल्याला लागली आहे. सुट्टे नाहीत म्हणून.. भाडं नाकारलं म्हणून.. केवळ आपल्याकडे पाहिलं म्हणून.. आईबाबांनी मोबाईल दिला नाही म्हणून.. मरण्याचं-मारण्याचं प्रमाण वाढलं आहे. कबीर हे त्या उतावीळ मानसिकतेचं लार्जर दॅन लाईफ स्वरुप आहे.
आता तुम्ही म्हणाल.. कसला मसाला पट.. असं कुठं असतं होय. कबीरसारख्या व्यक्तिरेखा समाजात नकोच. चूकच आहे ते. बरं. आपण तसंही धरुन चालू. मग कबीरसारखं वर्तन करणाऱ्या सगळ्यांचाच निषेध व्हायला हवा. पण तसं होताना दिसत नाही. सेन्सॉर संमत होऊन थिएटरमध्ये लागलेल्या कबीरचा आपण निषेध करतो. पण कोणत्याही सेन्सॉरविना घराघरात घुसून उरलेल्या कबीरी मानसिकतेचं काय? आज एक कबीर रोज आपल्या घरात घुसून मनोरंजनाच्या नावाखाली शीघ्रकोपी मानसिकता दर्शवतो. त्याच्याबद्दल कुणीच का आवाज करत नाही? येतंय का लक्षात?
सध्या टीव्हीवर एक शो सुरुय. पाहता का तुम्ही? तुम्ही म्हणाल कबीरच्या लेखात हे कुठं आलं? सध्या या शोमध्येही कबीर सिंगची भ्रष्ट आवृत्ती आहे. या शोमधला 'हा' कबीर कसाही राहतो. आपल्याच मस्तीत असतो. त्यालाही भयंकर संताप येतो. तो घरातल्या महिलांना अर्वाच्च शिवीगाळ करतो. त्या इतक्या वाईट असतात की त्यांना म्युट कराव्या लागतात. असं सगळं तो करतो. पण तरीही त्या शोमधली कोणतीही महिला त्याचा निषेध करत नाही. उलट तो ज्या महिलांना शिवीगाळ करतो त्याच मुली, महिला त्याची सेवा करत असतात. दुसऱ्या दिवशी त्याला गरम गरम जेवण वाढत असतात. त्याची माफी मागतात. शोमधल्या सोडाच. पण हे सुरु असताना आपण सगळे ते शांतपणे पाहात असतोच की. कुणीही त्यावर आक्षेप घेत नाही. निषेध करत नाही. का? खरंतर हे जास्त आक्षेपार्ह नव्हे काय?
कबीर सिंगमधली नायिका अशाच मुलींचं प्रतिनिधित्व करते. कबीर कितीही चिडका, हट्टी, वेडसर असला तरी त्याच्या मागेमागे जाते. तो चित्रपट काल्पनिक असूनही आपल्याला ते खटकतं. पण रिअलिटी शोमधली ही मंडळी आपल्याला चालतात. मग 'हा' कबीर आपल्याला कसा चालतो? तो चालतो कारण आपण त्याला फारसं महत्त्व देत नाही. तो शो आहे. तो रंजन करतो हे माहितीये आपल्याला. या शोमधला सगळा बनाव असतो. ते खोटंखोटं असतं. कुणीतरी कुणाला तरी मुद्दाम ते करायला लावलं आहे. टीआरपीकाठी मुद्दाम असं कुभांड रचलं जातं असं सांगत आपण आपली समजून काढतो. मग हा कबीर सिंगही तसाच आहे.
तो पाहायचा आणि सोडून द्यायचा. निषेध, विचार आणि आक्षेप घ्यायचाच असेल तर आपल्या घरात, भवताली असलेल्या कबिरी मनोवृत्तीचा करायला हवा.आता फक्त सोयीचं काय इतकाच मुद्दा आहे.
Movie Review | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Embed widget