एक्स्प्लोर
Happy Birthday Salman : अर्पिताने दिले सलमानला खास बर्थडे गिफ्ट
सलमानच्या वाढदिवसामुळे खान परिवारात आनंदाचे वातावरण असतानाच आता अर्पिताने आनंद द्विगुणित करणारी बातमी दिली आहे. खान आणि शर्मा कुटुंबीयात एका नव्या पाहुणीचं आगमन झाल आहे.
मुंबई : बॉलीवूडचा दबंग खान सलमानचा आज 54 वा वाढदिवस आहे. सलमानच्या छोट्या बहिणीने म्हणजे अर्पिता खान शर्माने वाढदिवसाच्या दिवशी खास भेट दिली आहे. सलमानच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अर्पिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. संपूर्ण खान आणि शर्मा कुटुंबीय नव्या पाहुणीच्या येण्याने आनंदात आहे. अर्पिता व आयुषने त्यांच्या मुलीचे नाव 'आयत' असे ठेवले आहे.
सलमानची बहिण अर्पिता हिने सलमानच्या वाढदिवशीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सिझेरियन पद्धतीने अर्पिताची डिलिव्हरी करण्यात आली. अर्पिताला एक गोंडस मुलगी झाली असून या नव्या पाहुण्यामुळे खान कुटुंबात आनंदच आनंद आहे. अर्पिताचे हे दुसरे मूल आहे. अर्पिता व आयुष शर्मा या जोडप्याला याआधी अहिल हा मुलगा आहे. अहिल हा चार वर्षांचा आहे.
मध्यरात्री त्यानं बॉलिवूडसाठी पार्टीचंही आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी अर्पिताही उपस्थित होती. सलमानने अर्पिता गर्भवती असल्यामुळे त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर साजरा करण्याऐवजी भाऊ सोहेल खानच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
2014 साली अर्पिता आणि आयुषचा हैदराबाद येथील ताज हॉटेलच्या फलकनुमा पॅलेस येथे विवाह झाला होता. अर्पिताचा पती आयुष शर्माने सोशल मिडीयावर ही गोड बातमी दिली. आणि थोड्याच वेळात दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आयुष म्हणाला, ईश्वराच्या कृपेने आमच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. आनंदाच्या या क्षणी आम्ही मित्रांचे, नातेवाईकांचे आणि सर्व हितचिंतकांचे आभार मानतो.
अर्पिताला आज सकाळी हिंदुजा रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement