April 2024 movie Released : लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हे सिनेमे करणार कलेक्शन; एप्रिल महिन्यात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची रेलचेल
Films Releasing in April 2024 : एप्रिल महिना सिनेप्रेक्षकांसाठी खूपच खास आहे. या महिन्यात सिनेमागृहात अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. एकीकडे निवडणुकीचा माहोल असताना सिनेप्रेमी मात्र सिनेमा पाहताना दिसून येणार आहेत.
April 2024 movie Released : लोकसभा (loksabha election 2024 ) इलेक्शनचे बिगुल वाजल्याने प्रचाराचा धुरळा उडताना सर्वत्र दिसतो आहे. निवडणूकीच्या रिंगणात राजकीय नशीब आजमावण्यासाठी उभे राहिलेले उमेदवार मतदार राजाला साद घालताना सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलीवूडकर सज्ज आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे विविध धाटणीचे चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. यात बडे मिया छोटे मिया, मैदान, चमकिला, जैन यु, या सिनेमांचा समावेश आहे.
बडे मिया छोटे मिया : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनित बडे मिया छोटे मिया हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहत्यावर्गात चांगलीच चर्चा आहे. चित्रपटात मानुसी छील्लर आणि अलाया एफ दिसणार आहेत.
मैदान : या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता अजय देवगण याच्या कामाचे चाहते चांगलेच कौतुक करताना दिसत आहेत. निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची गोष्ट या सिनेमात दाखविण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 10 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहतावर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मिस्टर and मिसेस माही : मिस्टर and मिसेस माही या चित्रपटात जानव्ही कपूर आणि राजकुमार राव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट भारताचा माजी यशस्वी कर्णदार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पून्हा एकदा लाडक्या माहीवर येणाऱ्या चित्रपटाबद्दल जबरदस्त आसुक्य रसिकांमध्ये आहे.
चमकिला : इम्तियाज अलील यांनी चमकिला या सिनेमाची धुरा सांभाळली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि दिलजीत डोसान या चित्रपटांत मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. पंजाबचे लोकप्रिय गायक अमरसिह चमकिला आणि अमरज्योत कौर यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. १२ एप्रिल २०२४ रोजी नेटफिल्क्सवर हा चित्रपट पाहता येईल.
JNU : विद्यार्थांच्या राजकारणावर आधारित असलेला JNU हा बहुप्रतिक्षित चित्रपट रसिकांच्या भेटीला ५ एप्रिल २०२४ रोजी येणार आहे. या सिनेमात रवी किशन, रश्मी देसाई, उर्वर्षी रौतेला महत्वाच्या भूमिकेत रसिकांना दिसणार आहेत.
तेहरान : हा चित्रपट देखील 26 एप्रिल 2024 रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम आणि मानुसी छील्लर या चित्रपटात स्क्रीन शेअर करतांना दिसतील. एक्शन तडका असणाऱ्या या चित्रपटाबद्दल कमालीची उत्स्कुता आहे.