Annu Kapoor : ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक करणाऱ्याला बिहारमधून अटक
Annu Kapoor : ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक केली आहे.
Annu Kapoor : भारतीय सिनेृसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी कपूर यांची 4.46 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे 3.08 लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नू कपूर फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष पासवान (28) असून तो बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहे. आतापर्यंत त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, एक आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र आणि दोन सिमकार्ड जप्त केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
कपूर यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. एका व्यक्तीने कपूर यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की, तुमचं केवायसी अपडेट झालेलं नाही. ते अपडेट करणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीने नंतर अन्नू कपूर यांचे बॅंक खाते तपशील आणि ओटीटी शेअर करण्यास सांगितले. अन्नू कपूर यांना तो व्यक्ती बॅंक कर्मचारी आहे असं वाटलं आणि त्यांनी त्या व्यक्तीला सर्व तपशील दिले. त्यांनी ओटीटी देताच त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले.
भामट्याने 2 लाख आणि 2.36 लाखांचे दोन व्यवहार करत कपूर यांची फसवणूक केली. त्यानंतर कपूर यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि पुढील तपासाला सुरुवात केली. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी बिहारमधून आरोपीला अटक केली आहे.
अन्नू कपूर अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे किंवा वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून ते फसवणुकीमुळे चर्चेत होते. सायबर फ्रॉडमध्ये त्यांना तब्बल 4.36 लाखांचा गंडा घातला गेला. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत त्यांना फसवण्यात आलं.
अन्नू कपूर यांची 'क्रॅश कोर्स' ही वेबसीरिज गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी रतनलाल जिंदल ही भूमिका साकारली आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज झालेली आहे. या सीरिजमध्ये अन्नू कपूर यांच्यासोबतच भानू उदय, उदित अरोरा आणि अनुष्का कौशिक हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या