Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'ला 'ती' चूक पडली महागात; अंकिता वालावलकर नेटकऱ्यांकडून ट्रोल
Ankita Prabhu Walawalkar : अंकिता वालावलकरच्या 'वास्तव' रीलने नेटकरी दुखावले गेले आहेत.
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिचं एक रील सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. तिच्या या 'वास्तव' रीलने नेटकरी मात्र दुखावले गेले आहेत. प्रचंड कौतुक करणाऱ्या अंकितावर आता नेटकऱ्यांनीच टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंकिता वालावलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता तिने एक शॉप सुरू केलं आहे. हे शॉप सांभाळण्यासाठी तिला एका होतकरू मुलीची गरज होती.
View this post on Instagram
शॉप सांभाळण्यासाठी एका मेहनती मुलीची गरज असल्याचं अंकिताने तिच्या एका मित्राला सांगितलं होतं. त्यानुसार मित्राने एका मुलीला नोकरीसाठी अंकितासोबत संपर्क करण्यास सांगितलं. अंकिताने संबंधित मुलीला दुकानात दररोज झाडू मारावा लागेल, दिवाबत्ती करावी लागेल असं सांगितलं होतं. त्यानंतर त्या मुलीने या नोकरीसाठी आपला स्पष्ट नकार कळवला.
अंकिताच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त
मुलीने नोकरीसाठी दिलेला नकार आणि त्यामागचं कारण अंकिताला पटलं नाही. त्यानंतर तिने एक 'वास्तव' असं म्हणत एक व्हिडीओ शेअर करुन हा सर्व किस्सा सांगितला. पण या रीलचं कौतुक करण्यापेक्षा नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अंकिताला ट्रोल केलं. त्यामुळे मुलीच्या अॅटिट्युडवर प्रश्न उपस्थित करणं अंकिताला चांगलच महागात पडलं आहे.
अंकिता व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' एका टीकेला उत्तर देत थेट म्हणाली आहे की,"दहा हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये". अंकिताच्या या कमेंटनंतर तिला आणखी ट्रोल करण्यात आले. त्यानंतर स्पष्टीकरण देत अंकिता म्हणाली,"काही मुलींच्या अपेक्षा पाहून तयार केलेला हा व्हिडीओ आहे. अपेक्षांच्या नावाखाली घरी बसू नका. दुकानात झाडू मारल्याने आत्मसन्मान कमी होत नाही. मी कोणत्याही मुलीवर ही रील बनवलेली नाही. अशी कोणतीही मुलगी अस्तिस्वात नाही".
अंकिता वालावलकर नेटकऱ्यांकडून ट्रोल
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरच्या व्हिडीओवर झाडू मारायचा होता तर त आवडीबद्दल का विचारलं? एखाद्याची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करू नकोस, आपण किती कमावतो यावर आपला सेल्फ रिस्पेक्ट ठरतो का? दहा हजारात जॉब करणाऱ्या मुलींना सेल्फ रिस्पेक्ट नसतो हे सांगणारी तू कोण? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या