(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरला हवाय 'असा' जोडीदार; म्हणाली,"पैसा कमावणारा नसेल तरी चालेल, पण..."
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वी मिर्ची मराठीला दिलेल्या जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं आहे.
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नेहमीच ठामपणे तिची मते मांडत असते. सोशल मीडिया स्टार आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर असणारी कोकण कन्या (Kokan Hearted Girl) अल्पावधीत चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आता ती कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहे. अशातच एका मुलाखतीत अंकिताने होणाऱ्या जोडीदाराबद्दलच्या आपल्या अपेक्षांवर भाष्य केलं आहे.
मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar on Partner) जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं आहे. अंकिता म्हणाली,"मला एका चांगल्या समजूतदार मुलासोबत लग्न करायचं आहे. जो पैसा कमावणारा नसेल तरी चालेल. मी चांगला संसार चालेल एवढे पैसे कमावतेय. पण आज रात्री 2 वाजता मी घरी आली आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता झोपेतून उठू शकते, अशा छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बाकी जोडीदाराबद्दल माझ्या काही अपेक्षा नाहीत".
कोकणातल्या निसर्गाने अंकिता वालावलकरला काय दिलं?
मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत कोकणातील निसर्गाबद्दल बोलताना अंकिता वालावलकर म्हणाली,"कोकणातल्या निसर्गाने मला उद्योग दिला. देवबागसारख्या निसर्गसंपन्न गावात आमचा रिसॉर्ट आहे. कोकणातील निसर्गाने मला अनेक गोष्टी दिल्या आहेत. लहानपणापासून मला शहराचं आकर्षण होतं. आता मुंबईच्या धकाधकीची सवय झाली आहे. शहर आणि गावाची तुलना होऊ शकत नाही. कोकण ही माझी जन्मभूमी असून मुंबई माझी कर्मभूमी आहे. मला माझ्या कोकणात बेरोजगारी नको आहे".
मराठी माणसाने काय सोडावं?
अंकिता म्हणते,"मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे. तसेच दुसरा कोणी पुढे गेला तर तो काय केल्याने पुढे गेला याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
लोक काय म्हणतील यागोष्टीचा मी आधी विचार करायचे. पण आता लोकांचा विचार करणं मी सोडून दिलं आहे".
अंकिता पुढे म्हणाली,"आता मला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी मी मुद्दाम करते. लोकांच्या ट्रोलिंगकडे मी दुर्लक्ष करते. ज्याची आर्थिक परिस्थिती खरचं खराब आहे अशा माणसाला संधी मिळायला हवी. आता प्रत्येकालाच आरक्षण हवं आहे. पण ज्याला खरी गरज आहे तो कुठेतरी मागे पडतोय".
अंकिताने नुकतचं प्लॅनेट मराठी ओटीटीसाठी स्टँडअप कॉमेडी केलं असून तिचा हा पहिलाच प्रयोग फसला असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
संबंधित बातम्या