Bollywood Actress Anita Ayub : कातील अदांनी बॉलिवूड गाजवलं, पाकिस्तानची हेर अन् दाऊदची गर्लफ्रेंड; वादाच्या भोवऱ्यात अडकलेली 'ती' अभिनेत्री काय करतेय?
Bollywood Actress Anita Ayub : काही पाकिस्तानी अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये काम केले पण कालांतराने त्यांनी इंडस्ट्रीपासून दोन हात लांब राहणे पसंत केले. यामध्ये अनिता अयुब (Anita Ayub) या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे.
Bollywood Actress Anita Ayub : बॉलिवूडने (Bollywood) पाकिस्तानी अभिनेत्रींना चित्रपटात स्थान देत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले आहे. माहिरा खान (Mahira Khan), वीणा मलिक (Veena Malik), सबा कमर आणि झेबा बख्तियार आदी अभिनेत्रींची नावे चर्चेत असतात. काही अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये काम केले पण कालांतराने त्यांनी इंडस्ट्रीपासून दोन हात लांब राहणे पसंत केले. यामध्ये अनिता अयुब (Anita Ayub) या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी केल्याचा आरोप आहे. त्यातून तिची पाकिस्तानमध्ये पुन्हा रवानगी करण्यात आली.
पाकिस्तानमध्ये शिक्षण, मुंबईत अभिनयाचे धडे
अनिता अयुबचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे झाला. तिथल्या एका खाजगी मुलींच्या कॉलेजमधून तिनं शालेय शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कराची विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली. यानंतर एका मॉडेलिंग एजंटने अभिनेत्रीला एका जाहिरातीसाठी मॉडेल करण्याची ऑफर दिली, त्यामुळे तिने होकार दिला आणि त्यानंतर अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आली. अनिताने मुंबईच्या रोशन तनेजा स्कूल ऑफ ॲक्टिंगमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. तेथे त्याने रोशन तनेजा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. या संस्थेतून शबाना आझमी, अनिल कपूर यासारख्या कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिनेत्रीने पीटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या काही मालिकांमध्ये काम केले होते. ज्यामध्ये 'गरदीश' आणि 'हसीना-ए-आलम' यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी भारतात चित्रपट केले.
देव आनंद यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
अनिता अयुबने 1993 मध्ये देव आनंद यांच्या 'प्यार का तराना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गँगस्टर' चित्रपटातही काम केले. दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री त्याला डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, अयुबने या प्रकारचे वृत्त फेटाळून लावले होते.
भारताची हेरगिरी केल्याचा आरोप
अनिता अयुबवर पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी केल्याचा आरोपही होता. फॅशन सेंट्रल या पाकिस्तानी मासिकाने इंडस्ट्रीतील अनेकांना अनिता पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे बॉलिवूडने तिच्यावर बहिष्कार टाकला. काम मिळत नसल्याने आणि कोंडी झाल्याने अखेर अनिताला मायदेशी परतावे लागले.
भारतीय उद्योजकासोबत विवाह
अनिता अयुबने भारतीय उद्योगपती सौमिल पटेलशी लग्न केले आणि त्याच्यासोबत न्यूयॉर्कला स्थायिक झाली. या दाम्पत्याला शेजर हा मुलगा झाला. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने पाकिस्तानी उद्योगपती सुबक माजिसशी विवाहबद्ध झाली. सध्या ती परदेशातच असल्याचे वृत्त आहे.