एक्स्प्लोर

Animal Box Offic collection Day: थांबायचं नाय गड्या...रणबीरच्या 'अॅनिमल' ची बॉक्स ऑफिसवर जादू; 16व्या दिवशी कलेक्शन झालं तरी किती?

Animal Box Office Day 16: 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटानं रिलीजच्या 16 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...

Animal Box Office Collection Day 16: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)  'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या संदीप रेड्डी वंगाच्या (Sandeep Reddy Vanga) या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या  अभिनयाचे अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटातील अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. अशातच आता या चित्रपटानं रिलीजच्या 16 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...

'अॅनिमल'चे कलेक्शन (Animal Box Office Collection)

sacnilk च्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, अॅनिमल या चित्रपटाने 16 व्या दिवशी 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 498.14 कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अॅनिमल या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याचं दिवशी 63.8 कोटींची कमाई केली होती.

 बॉक्स ऑफिसवर अॅनिमल आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' यांच्यामध्ये टक्कर झाली. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण रणबीर कपूरचा अॅनिमल या चित्रपटानं  'सॅम बहादुर' या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)

'अॅनिमल' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? (Animal OTT Release)

 पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' हा सिनेमा 2024 च्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅनिमल हा चित्रपट रिलीज केला जाईल, असं म्हटलं जात आहे. पण अजून नेटफ्लिक्सनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

गाण्यांनी मिळाली नेटकऱ्यांची पसंती

 जमाल कुडू, सतरंगा,हुआ मैं,सारी दुनिया जला देंगे, अर्जन वैली या अॅनिमल या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या गाण्यांवरील रिल्स अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

'अॅनिमल'  या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच चित्रपटातील रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांच्या इंटिमेट सीन्सची चर्चेचा सोशल मीडियावर झाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Aishwarya Narkar And Avinash Narkar: ‘अ‍ॅनिमल’मधील गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, "नारकर साहेब..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget