Animal And Sam Bahadur: अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रणबीरच्या 'अॅनिमल'नं केली बंपर कमाई; विकीच्या 'सॅम बहादुर' ला टाकलं मागे
रणबीर कपूरचा (Ranbir kapoor) अॅनिमल (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी या दोन्ही चित्रपटांना किती कलेक्शन केलं आहे? याबद्दल जाणून घेऊयात...
Animal And Sam Bahadur Advance Booking: 2023 हे वर्ष लवकरच संपणार आहे. वर्षाचा शेवट हा मनोरंजनानं होणार आहे. कारण डिसेंबर महिन्यामध्ये विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट रिलीज होणार आहेत. काही प्रसिद्ध अभिनेत्याच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर देखील होणार आहे. 1 डिसेंबर या दिवसाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. कारण या दिवशी अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir kapoor) अॅनिमल (Animal) हा चित्रपट आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. या दोन्हीही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आता अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी या दोन्ही चित्रपटांना किती कलेक्शन केलं आहे. याबद्दल जाणून घेऊयात...
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'अॅनिमल'नं मारली बाजी
अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी 'अॅनिमल' या चित्रपटानं बाजी मारली आहे. अॅनमल या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सॅम बहादुर या चित्रपटाला मागे टाकले आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, संपूर्ण भारतात अॅनिमल चित्रपटाच्या 111,000 पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे, ज्यात 90,526 तिकिटे हिंदीमध्ये, 20,591 तेलुगू भाषिक प्रदेशात आणि 200 तमिळ भाषिक भागात आहेत. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 3.4 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
View this post on Instagram
सॅम बहादुर चित्रपटाचं कलेक्शन
सॅम बहादुर चित्रपटाची जवळपास 12,876 तिकीटे विकली गेली आहेत, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सॅम बहादुर चित्रपटानं 44.71 लाख रुपयांचे कलेक्शन केलं आहे.
View this post on Instagram
सॅम बहादुर चित्रपटाची स्टार कास्ट
सॅम बहादुर हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात विकी हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.तर सान्या मल्होत्रानं या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.
'अॅनिमल'स्टार कास्ट
'अॅनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे.या चित्रपटात रणबीरसोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांनी देखील काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: