एक्स्प्लोर
अनिल कपूरच्या घरी एक लग्न जुळलं, एक मोडलं
मुंबई : अभिनेता अनिल कपूरसाठी एक आनंदाची बातमी आहे, तर एक दुःखाची. आनंदाची बातमी म्हणजे त्याची धाकटी मुलगी रिआ कपूर लवकरच लगीनगाठ बांधणार आहे, तर अनिल कपूरची भाची प्रिया सिंग हिचं लग्न मोडल्याची दुःखद बातमी आहे.
रिआचं लवकरच शुभमंगल :
अपकमिंग फिल्ममेकर करण बुलानी आणि रिआ लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रिआ आणि करण गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला.
गेल्या आठवड्यात करणच्या आई-वडिलांनी रिआचे पालक म्हणजे अनिल कपूर आणि सुनिता यांची भेट घेतली. लग्नाची बोलणी पूर्ण झाली असून दोघं डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र सोनम किंवा अनिल कपूर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
करण हा कपूर कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचा असून तो अनेकदा कपूर मंडळींसोबत हँगआऊट करताना दिसला होता. करणने 'वेक अप सिद' आणि सोनमची मुख्य भूमिका असलेल्या 'आएशा' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे.
प्रिया सिंगला दुसऱ्यांदा धक्का :
अनिल कपूर यांच्या पत्नी सुनिता यांची भाची म्हणजे प्रिया सिंग. सोनमची मावस बहिण प्रिया आणि आशिष महबुबानी लग्न करणार होते. लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आलेलं असताना आशिषचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
अनिल कपूरचे बेस्ट फ्रेण्ड, दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा सिकंदरसोबत प्रियाचा साखरपुडा यावर्षी जानेवारी महिन्यात झाला. अत्यंत थाटामाटात झालेल्या या सोहळ्याचे फोटो अनुपम खेर यांनी ट्वीट केले होते. मात्र मुंबई मिररच्या वृत्तानुसार सिकंदर आणि प्रिया यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक गोष्टींबाबत विचार आणि मतं पटत नसल्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचं बोललं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement