एक्स्प्लोर
'धक धक करने लगा'वर अनिल कपूर आणि नवनीत कौर राणांचा डान्स
दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधातल्या जुन्या संघर्षात आता राणा दाम्पत्यांनी बॉलिवूड उतरवलं आहे.
!['धक धक करने लगा'वर अनिल कपूर आणि नवनीत कौर राणांचा डान्स anil kapoor dance with Navneet kaur rana in Dahihandi 'धक धक करने लगा'वर अनिल कपूर आणि नवनीत कौर राणांचा डान्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08195412/anil-kapoor-rana.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : वाघाचं साम्राज्य असलेल्या आणि राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या मेळघाटात येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाघाला अडवण्यासाठी वेगळंच राजकारण सुरु आहे. आमदार रवी राणा यांनी आपली पत्नी नवनीत कौर राणा यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.
आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याकडून शिवसेनेच्या विरोधात एखाद्या बॉलिवूड पटाला शोभेल अशी म्युझिक, डान्स, ड्रामा, थ्रिल आणि इमोशन्सने परिपूर्ण व्यूहरचना करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधातल्या जुन्या संघर्षात आता राणा दाम्पत्यांनी बॉलिवूड उतरवलं आहे.
आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीत आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदानंतर एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर सहभागी झाले. यावेळी अनिल कपूर यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. अनिल कपूरला पाहण्यासाठी अनेकांनी स्टेजजवळ येण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही काळ गोंधळ उडाला. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. त्यानंतर मात्र, कार्यक्रम व्यवस्थित सुरु झाला.
दरम्यान, या कार्यक्रमात अनिल कपूर यांनी नवनीत राणा यांच्यासोबत डान्स केला. या डान्सने उपस्थितांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं. अनिल कपूर यांनी डान्स सुरु केला आणि नवनीत राणा यांनाही डान्स करायला लावला. मग नवनीत राणा यांनी पती रवी राणांनाही डान्स करण्याचा आग्रह केला.
आम्ही अमरावतीत लढू आणि शिवसेनेला इथून हद्दपार करु. मुख्यमंत्रीही आमच्या पाठिशी असल्याचा उघड दावाही या उत्सवात करण्यात येत आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांनी आखलेली व्यूहरचना कामी येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.अमरावती : दहीहंडीच्या कार्यक्रमात अनिल कपूर यांचा नवनीत कौर राणांसोबत डान्स #NavneetKaur #AnilKapoor pic.twitter.com/YGjIevoprS
— ABP माझा (@abpmajhatv) September 8, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)