एक्स्प्लोर
नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट, पती अंगद बेदीची कबुली
मी आणि नेहा अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो, मात्र ती गर्भवती राहिल्याने घाईने लग्नाचा निर्णय घेतल्याची कबुली अंगदने दिली.
![नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट, पती अंगद बेदीची कबुली Angad Bedi tells Neha Dhupia was pregnant before marriage नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट, पती अंगद बेदीची कबुली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/25101547/Neha-Angad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा गौप्यस्फोट खुद्द तिचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने केला आहे. नेहाने घाई-गडबडीत लग्न उरकल्यानंतर तिचं बेबी बम्प दिसू लागल्यावर चाणाक्ष चाहत्यांनी आधीच तर्क लावला होता. अखेर, हो-नाही करता करता अंगदने अळीमिळी गुपचिळी सोडली.
35 वर्षीय अंगद आणि 37 वर्षीय नेहा 10 मे रोजी पंजाबमधील एका गुरुद्वारात विवाहबंधनात अडकले होते. नेहा प्रेग्नंट असल्यामुळे दोघांनी घाईने लग्न केल्याच्या चर्चांना काही दिवसांतच सुरुवात झाली. मात्र नेहा आणि अंगद या दोघांनीही लग्नाआधी नेहा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा उडवून लावल्या होत्या.
लग्नानंतर नेहा कायम सैल कपड्यांमध्येच दिसत होती. गर्भवती असल्याचं समजू नये, यासाठी तिने काळजी घेतल्याचं म्हटलं जात होतं. अखेर लग्नाच्या तीन महिन्यानंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्यात दोघांनी ही गुड न्यूज सोशल मीडियावरुन दिली.
आता नेहाने 'नो फिल्टर नेहा' या तिच्या रेडिओ चॅट शोमध्ये पती अंगदला निमंत्रित केलं होतं. या शोमध्ये अंगदने अनेक गुपितं उलगडली. आम्ही अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो, मात्र ती गर्भवती राहिल्याने घाईने लग्नाचा निर्णय घेतल्याची कबुली अंगदने दिली.
'माझी गर्लफ्रेण्ड नेहा प्रेग्नंट आहे, असं मी घरी सांगितलं तेव्हा घरी खूप ओरडा पडला. अखेर मी आई-वडिलांना घेऊन नेहाच्या घरी गेलो आणि आम्ही तिच्या आई-वडिलांना प्रेग्नन्सीविषयी सांगितलं. त्याचवेळी मी नेहाला प्रपोजही केलं.' असं अंगदने सांगितलं.
'गुलाबजाम, डोसे, चहा आणि बिअर पिऊन झाल्यानंतर मी याविषयी सांगितलं. काही काळासाठी घरात शांतता पसरली. तिच्या आई-वडिलांनी आम्हाला झापलं. नेहाची आई प्रचंड चिडली होती' अशी आठवणही अंगदने सांगितली.
नेहा डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.
‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी विद्या बालनसोबत ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात, तर 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.
अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. अंगद बेदीनेही काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)