एक्स्प्लोर
Advertisement
एकदम अनाडी दिसत्ये, पत्नी हेमा मालिनी यांचं धर्मेंद्र यांच्याकडून ट्रोलिंग
हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात संसदेबाहेरच्या रस्त्याची झाडलोट केली होती. व्हिडिओ वायरल झाल्यावर नेटिझन्सनी दोघांना यथेच्छ ट्रोल केलं.
नवी दिल्ली : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी गेल्या आठवड्यात संसदेबाहेरच्या रस्त्याची साफसफाई केली. साक्षात 'ड्रीमगर्ल' हातात झाडू घेऊन कचरा काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल व्हायला वेळ नाही लागला. त्यानंतर हेमा मालिनी यांचे पती आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनीच त्यांची 'अनाडी दिसत आहे' म्हणत खिल्ली उडवली.
हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात संसदेबाहेरच्या रस्त्याची झाडलोट केली होती. व्हिडिओ वायरल झाल्यावर नेटिझन्सनी दोघांना यथेच्छ ट्रोल केलं. हेमा मालिनी यांनी हातात धरलेला झाडू जमिनीला टेकतही नसल्याचं काही जणांनी म्हटलं. धर्मेंद्र यांनीही आपल्या पत्नीचा पाय खेचण्याची संधी सोडली नाही.
'सर, मॅडमनी प्रत्यक्षात कधी हातात झाडू घेतला आहे का?' असा प्रश्न एका ट्विटराईटने विचारला. 'हो चित्रपटामध्ये. मला पण ती अनाडी वाटली. मात्र मी आईची लहानपणी खूप मदत केली आहे. मैं झाडू मारण्यात पटाईत होतो. मला स्वच्छतेची आवड आहे' असं उत्तर धर्मेंद्र यांनी ट्विटरवर दिलं.
सर, मैडम ने ऐक्चूअली कभी ज़िंदगी में झाड़ू उठायी क्या? 🧐
— Sidd (@sidd_sharma01) July 14, 2019
'महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संसद परिसरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. पुढच्या आठवड्यात मथुरा या माझ्या मतदारसंघात जाऊन मी पुन्हा हे अभियान राबवेन' असं हेमा मालिनी साफसफाईनंतर म्हणाल्या होत्या.Haan films main , mujhe bhi अनाड़ी लग रहीं थीं . मैं ने मगर बचपन में , अपनी माँ का हमेशा हाथ बटाया है । मैं झाड़ू में माहिर था । I love cleanliness 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 14, 2019
#WATCH Delhi: BJP MPs including Minister of State (Finance) Anurag Thakur and Hema Malini take part in 'Swachh Bharat Abhiyan' in Parliament premises. pic.twitter.com/JJJ6IEd0bg
— ANI (@ANI) July 13, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement