Raysa Pandey: अनन्याच्या बहिणीचा रेझ्यूमे व्हायरल,युझर्समध्ये परसली नेपोटिझमची लाट, फॅन्स मध्ये पडले अन् म्हणाले, 'का फायदा घेऊ नये..'
रायसानं न्यूयॉर्कच्या टीश स्कूल ऑफ आर्टस या फिल्ममेकींग कोर्स केला आहे. तिच्या लिंकडिन अकांऊंटवरून तिचा रेज्यूमे व्हायरल होत आहे.
Raysa Pandey: करण जोहरनं आपल्या चित्रपटातून स्टूडंट ऑफ द इयर २ मधून अनन्या पांडेला संधी दिली होती. जेव्हा अनन्याला अभिनयाची ही मोठी संधी मिळाली होती त्यानंतर केवळ नेपोटिझमची चर्चा समोर आली होती. आता तिच्यानंतर तिची लहान बहीण २० वर्षांची रायसा पांडे नेपोटिझममुळे चर्चेत आली आहे. २०२२ मध्ये भावना पांडे यांच्या रिॲलिटी शोमधून 'द फैबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स 2' मध्ये दिसलेल्या रायसाचा Linkdin वर रेज्यूमे व्हायरल होत आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा नेपोटिझमच्या चर्चा रंगल्या आहेत.
रायसाचा रेझ्यूमे व्हायरल
रायसानं न्यूयॉर्कच्या टीश स्कूल ऑफ आर्टस या फिल्ममेकींग कोर्स केला आहे. तिच्या लिंकडिन अकांऊंटवरून तिचा रेज्यूमे व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनी नेपोटिझमवरुन परत रायसाला बोलायला सोशल मीडियावर सुरुवात केलीय.एका युझरनं लिंकडिनवरून रायसा पांडेच्या रिज्यूमेचा स्क्रीनशॉट काढून शेअर केला. यात तिनं ३ प्रोडक्शन हाऊससोबत इंटर्न म्हणून काम केल्याचा उल्लेख आहे. यात शाहरुख खान आणि गौरी खानच्या सर्वात मोठ्या रेड चिलीज एंटरटेनमेंटचाही समावेश आहे. दुसरा फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या टायगर बेबी यांच्यसोबत इंटर्नशीपचा उल्लेख करण्यात आलाय.
नेपोटिझमच्या चर्चांना उधाण
या ट्विटवर अनेकांनी नेपोटिझम असल्याचं लिहिलंय. एकानं लिहिलंय,हे तर जूनच नेपोटिझम!पण काहींनी रायसाला सपोर्टही केल्याचं दिसतंय. ट्रोलर्सच्या नेपोटिझमच्या चर्चांमध्ये रायसाच्या बाजूनंही अनेकांनी लिहिलंय.एकानं लिहिलंय, जर मला नेपोटिझमचा फायदा घेता आला तर मी नक्की घेईन. काही जण म्हणाले तिनं का फायदा घेऊ नये.. तर अनेकांनी लिहिलं काही न करण्यापेक्षा चांगलं आहे. अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या कामानं इंडस्ट्रीत धुमाकुळ घातला आहे. आता तिच्या बहिणीचा रिज्यूमे एका युझरनं व्हायरल करत त्यावर लिहिलं हे तर जूनंच नेपोटिझम. त्यामुळं अनन्यानंतर रायसालाही नेटकऱ्यांनी नेपोटिझमचा शिक्का मारला. पण अनन्या आणि रायचाच्या फॅन्सनं मध्ये पडत ट्रोलर्सला चांगलंच सुनावलंय. यात त्यांनी अनन्या आणि रायसाचा बचाव केला.