![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अभिनेत्री अनन्या पांडेला प्रेमात मिळाला धोका? आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअपबाबत मोठा खुलासा
Ananya-Aditya Breakup Reason : अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या डेटिंग लाईफबद्दल सांगितलं की, आदित्य रॉयसोबत का ब्रेकअप का केला.
![अभिनेत्री अनन्या पांडेला प्रेमात मिळाला धोका? आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअपबाबत मोठा खुलासा ananya panday aditya roy kapur breakup what is reason actress reveled shocking reason loyalty respect love story celebrity love Affiar marathi news अभिनेत्री अनन्या पांडेला प्रेमात मिळाला धोका? आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअपबाबत मोठा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/15/3b9faeedf3498101d0bf4c173f9174221726371649632322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ananya Panday-Aditya Roy Kapur Breakup Reason : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या 'कॉल मी बे' (Call me Bae) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री अनन्या पांडे अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अनन्या पांडेचं आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. अनंत अंबानीच्या लग्नानंतर तिचं नाव हार्दिक पांड्यासोबतही जोडलं गेलं. पण आता अभिनेत्रीचं नाव मॉडेल वॉकर ब्लँकोसोबत जोडलं जात आहे. दरम्यान, अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या डेटिंग लाईफवर भाष्य केलं आहे. अनन्या पांडेने आदित्य रॉयसोबत का ब्रेकअप का केला याचा खुलासाही केला.
अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या ब्रेकअप कारण काय?
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत होते, काही काळापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. अनन्या आणि आदित्य यांच्या रिलेशनशिपची बातमी समोर आल्यापासूनच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातच काही काळाने यांच्या ब्रेकअपची बातमी आली. याचं कारण समजलं नसलं तरी या कपलचे चाहते नाराज झाले होते. अनन्या पांडेने आता त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
अनन्या काय म्हणाली नात्याबद्दल?
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली. तिथे तिला विचारण्यात आलं की, तिच्या आयुष्यात सध्या कुणी खास व्यक्ती आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना अनन्या म्हणाली की, 'मला प्रेमाच्या बाबतीत रहस्य ठेवायला आवडेल, कारण मला प्रेम करायला आवडतं. मी कोणत्याही डेटिंग ॲपवर नाही. मला खऱ्या आयुष्यात भेटायला आवडेल. मला एक लव्ह स्टोरी हवी आहे. माझा जोडीदार आदर देणारा आणि प्रामाणिक असावा अशी माझी इच्छा आहे. जर तिच्या जोडीदारात या गोष्टी नसतील तर त्याचं नातं फार काळ टिकणार नाही, मग ब्रेकअप होईल, असंही तिनं सांगितलं.
आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअपचं कारण आलं समोर
जोडीदारात कोणती गुणवत्ता हवीय, याबाबतील अनन्या पांडेची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर चाहते आता याचा संबंध आदित्य रॉय कपूरसोबतच्या ब्रेकअपशी लावत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेने असंही सांगितलं की, जर जोडीदारामध्ये हे गुण नसतील तर ब्रेकअप नक्कीच होईल. त्यामुळे कदाचित याच कारणामुळे अनन्याचा आदित्य रॉयसोबत ब्रेकअप झाला असावा, असं मानलं जात आहे.
अनन्याच्या वक्तव्यानंतर तिला जोडीदारामध्ये जे गुण हवे होते ते आदित्यमध्ये नव्हते, अशी चर्चा रंगली आहे आणि हेच त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत वक्तव्य किंवा घोषणा केली नाही. मात्र, तरी अनन्या पांडेने 'कॉफी विथ करण' या शोमध्ये ती आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचे संकेत दिले होते. यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर येऊ लागल्या, पण दोघांनीही या प्रकरणावर मौन बाळगलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : आर्याचं जरा चुकलंच, कानाखाली नाही, तुडवायला हवं होतं; नेटकऱ्यांचा आर्याला फुल्ल पाठिंबा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)