एक्स्प्लोर

Mumbai Crime Dancer: आरे कॉलनीतील बंगल्यात बिअर पिऊन स्विमिंग पूलमध्ये डान्स प्रॅक्टिस, नृत्य प्रशिक्षकाचा तरुणीवर अत्याचार, मुंबई पोलिसांकडून अटक

Mumbai Crime Dancer: आरे कॉलनीत नृत्यांगनेवर बलात्कार; नृत्य प्रशिक्षक, इव्हेंट ऑर्गनायझरला आरे पोलिसांनी केली अटक. याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Mumbai Crime Rape case: मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्रीत नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरे पोलिसांनी 22 वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला एका 32 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार आता दाखल करण्यात आली आहे. पीडिता अंधेरीत राहणारी असून ती चित्रपट व स्टेज शोमध्ये बॅकग्राऊंड नृत्यांगना (Background Dancer) म्हणून काम करते. आरोपी हा मालाडचा रहिवासी असून डान्स कोच व कार्यक्रम आयोजक आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी (Mumbai Police) भा.न्या.सं.च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून तो सध्या पोलीसकोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराचा आरोपी असलेला नृत्य प्रशिक्षक आणि पीडित तरुणीची भेट जानेवारी महिन्यात गोवा येथे झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात हे दोघे पुन्हा भेटले. त्यावेळी पीडित तरुणी ही कामाच्या शोधात होती. तेव्हापासून या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. यानंतर नृत्याच्या सरावासाठी आरे कॉलनीतील रॉयल पाम येथे भाड्याने घेण्यात आलेल्या बंगल्यात हे दोघेजण भेटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा सराव सुरु होता. एक दिवस नृत्याचा सराव सुरु असताना आरोपीने आपल्याला बिअर प्यायला दिली आणि दोघांना नशा चढली. त्यानंतर हे दोघे वॉटर कॉन्टॅक्ट डान्सचा सराव करण्यासाठी स्विमींग पूलमध्ये उतरले. तोपर्यंत खूप रात्र झाल्याने दोघांनी आरे कॉलनीतील बंगल्यातच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, रात्री नृत्य प्रशिक्षकाने नशेत असल्याचा फायदा घेऊन तरुणीवर दोनदा बलात्कार केला, असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या सगळ्या प्रकाराचा तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे तरुणीला पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला. त्यामुळे संबंधित तरुणीने सहा महिन्यांनी तक्रार दाखल केली. गेल्या महिन्यात ही तरुणी आमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. आम्ही तिचा जबाब नोंदवून घेतला आणि संबंधित नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणाची सध्या चौकशी केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक संपत घुगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या देखरेखीत या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आणखी वाचा

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही; चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget