Anant Ambani Radhika Merchant : राधिका - अनंतच्या प्री वेडिंगच्या फंक्शनसाठी कपूर परिवार पोहचला, आलिया - रणबीरसह राहानेही वेधलं लक्ष
Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. यांच्या या फंक्शनसाठी आता कपूर परिवार देखील हजेरी लावणार आहे.
![Anant Ambani Radhika Merchant : राधिका - अनंतच्या प्री वेडिंगच्या फंक्शनसाठी कपूर परिवार पोहचला, आलिया - रणबीरसह राहानेही वेधलं लक्ष Anant Ambani Radhika Merchant Pre wedding Function in Jamnanagar Ranbir Kapoor Nitu Kapoor Aalia Bhat and Raha Kapoor is present for the function detail marathi news Anant Ambani Radhika Merchant : राधिका - अनंतच्या प्री वेडिंगच्या फंक्शनसाठी कपूर परिवार पोहचला, आलिया - रणबीरसह राहानेही वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/b218f30314b7efb73311eeed4d87156f1709211136042720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anant Ambani Radhika Merchant : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant ) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 1 मार्च ते 3 मार्चदरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन होणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. बॉलिवूडपासून साऊथच्या सिने तारका जामनगरला पोहचलेत. तसेच सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. आता नुकतच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियासह (Aalia Bhat) लेक राहा देखील या कार्यक्रमांसाठी पोहचली आहे.
कपूर परिवारावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी राहा ही आलियाच्या मांडिवर बसली होती. आलिया आणि रणबीर कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगला त्यांची मुलगी राहा आणि आई नीतू कपूरसोबत पोहोचले आहेत. दरम्यान आता सध्या या प्री वेडिंग फंक्शनची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
रणबीर, आलिया आणि नीतू कपूर जामनगरला पोहचले
अनंत आणि राधिका यांच्या प्रीवेडिंगसाठी रणबीर, आलिया आणि नीतू कपूर दाखल झालेत. तसेच त्यांच्यासोबत चिमुकली राहा देखील स्पॉट झाली. सध्या या प्रीवेडिंगची चर्चा सगळीकडे आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाची टीमही या प्रीवेडिंग फंक्शनसाठी पोहचली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता.
अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग फंक्शन
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे 12 जुलै रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्याआधी गुजरातमधील जामनगर येथील अंबानी इस्टेट येथे 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन्स होणार आहेत. त्यासाठी अनेक दिग्गज सध्या जामनगरमध्ये दाखल झालेत. डिसेंबर 2022 मध्ये अनंत आणि राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनी हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)