Amruta Subhash: अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी होणार आई-बाबा? अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
अमृतानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटी आणि अमृताचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
Amruta Subhash: मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाषनं (Amruta Subhash)सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर ती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, अमृता सुभाषची ही पोस्ट म्हणचे चित्रपटाचं प्रमोशन आहे का? की खरच ती आई होणार आहे? याबाबत संभ्रम आहे. कारण पोस्टमध्ये तिने तसा कुठेच थेट उल्लेख केलेला नाही. पण अमृताच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
अमृताची पोस्ट
अमृतानं सोशल मीडिया एका प्रेग्नन्सी किटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन अमृतानं लिहिलं, 'ओह, द वंडर बिगिन्स' अमृताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी हे आई-बाबा होणार आहेत. अमृताच्या या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन अमृता आणि तिचा पती संदेश कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अमोल पराशर, डॉली सिंह, सुकन्या कुलकर्णी आणि ऋतुजा बागवे या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता आणि संदेश यांनी 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. दोघीही सध्या त्यांच्या पुनःश्च हनिमून या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. वेगवेगळ्या शहरांमध्ये अमृता आणि संदेश यांच्या या नाटकाचे प्रयोग होत असतात.
View this post on Instagram
अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस,किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच गल्ली बॉय या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. सेक्रेड गेम्स-2, बॉम्बे बेगम्स आणि सास बहू आचार प्रा. ली या वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.