Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना आवडलं 'मूड बना लिया' गाणं; अमृता फडणवीस म्हणाल्या, 'ते म्हणाले, चांगलं आहे पण, नक्की ट्रोल होणार'
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे गाणं कसं वाटलं? असा देखील प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला.
Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं 'आज मैंने मूड बना लिया है' (Aaj Main Mood Bana Liya Ay)हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं काही लोक कौतुक करत आहेत, तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना नवं गाणं कसं वाटलं? असा देखील प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नांना अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.
'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या, 'मला खूप आनंद होत आहे. लोकांना हे गाणं आवडलं. लहान मुलं या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील हे गाणं आवडत आहे, याचा मला आनंद होत आहे. माझा विश्वास आहे की, एखादी स्त्री कोणीही निगेटिव्ह कमेंट केली तरीही काम करत राहिली. '
देवेंद्र फडणवीस यांना हे नवं गाणं कसं वाटलं? असा प्रश्न विचारल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या, 'देवेंद्रजींनी गाणं पाहिल्यानंतर मला सांगितलं की, गाणं चांगलं आहे. पण त्यांची पॉलिटिकल पोझिशन आहे, त्यामुळे हे गाणं नक्की ट्रोल होईल, असंही त्यांनी मला सांगितलं. या गाण्याला काही लोकांनी ट्रोल देखील केलं. मी त्यासाठी तयार होते.'
ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारल्यानंतर अृमता फडणवीस म्हणाल्या,'मला ट्रोल होण्याची सवय झाली आहे. मी देवाचं भजन जरी म्हणलं तरी लोक मला ट्रोल करतात. मी ट्रोलर्सचे आभार मानते. ट्रोलिंगचा मला फरक पडत नाही.'
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना या गाण्यावर रिल बनवण्याचं आवाहन केलं आहे.
View this post on Instagram
मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत. त्याचं 'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Amruta Fadnavis : "मूड बना लिया" म्हणत अमृता फडणवीस थिरकल्या; चाहत्यांना केलं आवाहन