Ashoke Pandit On Amol Palekar: 'दो दीवाने शहर में'; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अमोल पालेकर सहभागी होताच 'या' फिल्म मेकरनं केलं ट्वीट
आता एका प्रसिद्ध दिग्दर्शनानं ट्वीट शेअर करुन अमोल पालेकर (Amol Palekar) यांच्यावर निशाणा साधला आहे.
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सध्या सहभागी होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर (Ashoke Pandit) आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेमध्ये सामील झाले. आता एका प्रसिद्ध फिल्म मेकरनं ट्वीट शेअर करुन अमोल पालेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
अशोक पंडित यांचे ट्वीट
प्रसिद्ध दिग्दर्शक अशोक पंडित यांनी अमोल पालेकर आणि राहुल गांधी यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 'मला हा फोटो पाहून एक गाणं आठवलं. दो दीवाने शहर में रात में और दोपहर में आबोंदाना ढूँढते इक आशियाना ढूँढते हैं!' या कॅप्शनमध्ये त्यांनी भारत जोडो यात्रा अशा हॅशटॅगचा वापर केला आहे. अशोक पंडित यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अशोक पंडित यांच्या या ट्वीटला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'गोलमाल है सब गोलमाल है.'
यह तस्वीर देख कर एक ही गाना याद आ सकता है !
— Ashoke Pandit (@ashokepandit) November 21, 2022
दो दीवाने शहर में रात में और दोपहर में आबोंदाना ढूँढते इक आशियाना ढूँढते हैं ! #BharatTodoYatra pic.twitter.com/NRT8MFa9AS
काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं. 'देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून आज प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.' असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं होतं. अमोल पालेकर हे 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांना 'गोल माल' आणि 'नरम गरम' यांसारख्या चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली.
देश के प्रति अपनी ज़िम्मेदारी समझते हुए इसका निर्वहन करने के लिए आज प्रसिद्ध अभिनेता और फिल्म निर्देशक अमोल पालेकर जी अपनी पत्नी के साथ #BharatJodoYatra में शामिल हुए।
— Congress (@INCIndia) November 20, 2022
देश की आवाज बुलंद करने के लिए आपका धन्यवाद। pic.twitter.com/PrgctA2HkG
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Bharat Jodo Yatra: ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, संध्या गोखले भारत जोडो यात्रेत सहभागी; पाहा फोटो