Amitabh Bachchan Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाइक केल्यानंतर बिग बींची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
Amitabh Bachchan Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनने घटस्फोटाबाबत असलेली पोस्ट लाईक केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
Amitabh Bachchan Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबात वाद सुरू असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक (Abhishek Bachchan) हे सध्या वेगळे राहत असल्याचे म्हटले जात आहे. अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर घटस्फोटाची पोस्ट लाईक केली होती. त्यानंतर चर्चांना आणखीच उधाण आले.अभिषेकने घटस्फोटाबाबत असलेली पोस्ट लाईक केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्ट काय?
अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरून एक फोटो कॅप्शनसह पोस्ट केला आहे. फोटो शेअर करताना बिग बींनी लिहिले की, 'काम, काम, काम... आयुष्यातील हेच प्रोत्साहन आहे'. बिग बींच्या या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. या वयातही इतकं काम करण्यासाठी कोणीतरी त्याच्याकडून प्रेरणा घेत आहे. एका युजरने म्हटले की, तुम्ही अजूनही खूप मेहनत घेत आहात, तुम्हाला सलाम आहे. तर, आणखी एकाने सांगितले की तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात.
T 5075 - work work work .. the only incentive to life and living .. pic.twitter.com/lYD9QQmFcb
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 18, 2024
अभिषेकने लाईक केली होती घटस्फोटाबाबतची पोस्ट...
अभिषेक बच्चन याने इन्स्टाग्रामवर घटस्फोटांच्या प्रकरणावर भाष्य करणाऱ्या एका पोस्टला लाईक केले होते. त्यावरून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटांबाबत चर्चांना उधाण आले होते. या पोस्टमध्ये म्हटले होते की, प्रेम संपले की जोडपे सहज वेगळे होतात. त्यांना घटस्फोट घेण्यास कोणती गोष्ट भाग पाडते आणि इतके घटस्फोट का वाढत आहेत? घटस्फोट घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते. पण कधी कधी आपण विचार करतो त्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. पण इतकी वर्षे एकत्र राहून लोक वेगळे झाल्यावर या दुःखातून कसे बाहेर पडतात, अशा आशयाची ही पोस्ट होती.
अंबानीच्या विवाह सोहळ्यात वेगवेगळे दिसले कुटुंब
नुकतंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या हे एकत्र आले. तर दुसरीकडे अभिषेक हा वडील अमिताभ, आई जया, बहीण श्वेतास, भाचे नव्या आणि अगस्त्य सोबत आला होता. बच्चन कुटुंब एकत्र न दिसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.