एक्स्प्लोर

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : ऐश्वर्यासोबतचा संसार धोक्यात असल्याची चर्चा; घटस्फोटाच्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया, चाहत्यांनाही धक्का

Aishwarya Rai Abhishek Bachchan : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. अभिषेक बच्चनच्या सोशल मीडियावरील इन्स्टंट रिअॅक्शनने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Aishwarya Rai Abhishek Bachchan :   गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. मात्र, आतापर्यंत या दोघांनी किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अलीकडेच अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नात ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत पोहोचली. तर, बच्चन कुटुंब हे स्वतंत्रपणे ऐश्वर्या-आराध्याशिवाय पोहोचले  होते. त्यावेळी ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 

अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने  ऐश्वर्यासोबत फोटो काढला नाही. पण,  लग्न सोहळ्याच्या हॉलमधून आलेल्या एका फोटोत अभिषेक हा ऐश्वर्या आणि आराध्या सोबत दिसला होता. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये  आलबेल असल्याचे चाहत्यांना वाटले. पण, अभिषेक बच्चनच्या सोशल मीडियावरील एका अॅक्टिव्हीने त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे. 

अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अशातच घटस्फोटाशी संबंधित एक पोस्टला अभिषेकने लाईक केले. बरीच वर्ष संसार केल्यानंतर अचानक घटस्फोट होणे यावर ही पोस्ट होती. लेखिका हिना खंडेलवाल यांनी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. 

काय होती सोशल मीडियावरील पोस्ट?

हिना खंडेलवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'घटस्फोट घेणे कोणासाठीही सोपे नाही. रस्ता ओलांडताना हात पकडलेल्या वृद्ध जोडप्यांचे हृदयस्पर्शी व्हिडीओ पुन्हा बनवण्याची किंवा आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही? तरीही, कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. परंतु, अनेक दशके एकत्र राहिल्यानंतर, लहान-मोठ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहून त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, टप्पा एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा ते कसे सामोरे जातात? असे काय आहे जे त्यांना ब्रेकअप करण्यास प्रवृत्त करते आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? 

योगायोगाने, 'ग्रे घटस्फोट' किंवा 'सिल्व्हर स्प्लिटर्स'चे प्रमाण जगभरात वाढत आहे.  ग्रे घटस्फोट म्हणजे जेव्हा विवाहित जोडपे वयाच्या 50 व्या वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतात. कारणे वेगळी असली तरी आश्चर्यकारक नाही. या आशयावर ही पोस्ट आहे. 

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce :  ऐश्वर्यासोबतचा संसार धोक्यात असल्याची चर्चा; घटस्फोटाच्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया, चाहत्यांनाही धक्का

अभिषेकने पोस्टला केलं लाईक, चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

इतर अनेकांसह अभिषेक बच्चननेही ही पोस्ट लाईक केली. मात्र, त्याच्या या लाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा स्क्रीनशॉटही 'रेडडिट'वर व्हायरल होत आहे. मात्र सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये याबाबत मतभिन्नता दिसून आली. काहींनी अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये सगळं काही ठीकठाक नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काहींनी त्याची बाजू घेतली. त्याला पोस्टमधील कंटेट आवडला असेल म्हणून त्याने पोस्ट लाईक केली असेही काहींनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget