एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : बिग बी इज बॅक! डियायनर कुर्ता, पांढरे शूज अन् काळा चष्मा; गंभीर दुखापतीवर मात करुन अमिताभ बच्चन पुन्हा शूटिंगसाठी सज्ज

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.

Amitabh Bachchan Health Update : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले होते. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. 

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका फॅशन शोदरम्यानचा रॅम्पवर चालतानाचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी काळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि पायझमा परिधान केलेला दिसत आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, "माझ्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद... आता माझी तब्येत ठीक असून लवकरच याच जोशात मी पुन्हा रॅम्पवर येईन, अशी आशा आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

काळ्या रंगाचा डियायनर कुर्ता, पायजमा, पांढरे शूज आणि काळा चष्मा या लूकमध्ये अमिताभ बच्चन एकदम डॅशिंग दिसत आहेत. त्यांच्या हा फोटो पाहून चाहते आनंदी झाले आहेत. बिग बी लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याने चाहतेदेखील उत्सुक आहेत. त्यांच्यावर कमेंट्स करत ते आपला आनंद व्यक्त करत आहेत. 

अमिताभ बच्चन यांचा अपघात कुठे झाला? 

अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं शूटिंग हैदराबादमध्ये करत होते. या शूटिंगदरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा अपघात झाल्याचं चाहत्यांना कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले होते. 

अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' कधी होणार रिलीज? (Project K Release Date)

अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चनसह दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Amitabh Bachchan Health Update : "छातीवर पट्ट्या लावल्या आहेत, प्रकृतीत सुधारणा..."; शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली हेल्थ अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget