एक्स्प्लोर
Advertisement
अमिताभ बच्चन यांनी नागराजचा सिनेमा सोडला!
नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पुणे: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूडमधील पहिल्या ‘झुंड’ या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली आहे.
सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.
त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सैराट या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राजी केलं होतं.
नागराज मंजुळे यांची बिग बींवर हिंदी भाषेत फेसबुक पोस्ट
त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला.
याचा परिणाम सिनेमाच्या शेड्युलवर पडत गेल्याने, सातत्याने तारखा पुढे पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं वेळापत्रक बिघडलं. बिग बींनी मागील वर्ष हे या सिनेमासाठी राखून ठेवलं होतं. मात्र ते वेळेनुसार झालं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतला. नागराज मंजुळे यांच्या टीमसाठी हे निश्चितच धक्कादायक आहे. फुटबॉलशी संबंधित सिनेमा? नागराज मंजुळे फुटबॉलशी संबंधित विषयावर हिंदी चित्रपट बनवत आहेत. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांचीही भूमिका होती. त्याच्या चित्रीकरणासाठी नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागावर सेट उभा केला होता. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानभूतीपूर्वक विचार करत, त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसिल कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला. त्यामुळे सिनेमाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानातून हटवण्याचा आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिला होता. संबंधित बातम्या नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमात बिग बी दिसणार! फँड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट.. नागराजचा सिनेमासारखा प्रवास 'सैराट'फेम 'प्रिन्स' सुरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण सेट हटवा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मंजुळेंना आदेश हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement