Amitabh Bachchan Upcoming Movies : 'गणपत' ते 'कल्कि 2898 AD'; अमिताभ बच्चन गाजवणार बॉक्स ऑफिस! जाणून घ्या आगामी सिनेमांबद्दल...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Amitabh Bachchan Upcoming Movies : हम जहाँ खडे हो जाते हैं..लाइन वहींसे शुरू होती है... 'कालिया' सिनेमातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हा डायलॉग त्यांच्या करिअरसाठी अत्यंत योग्य आहे. गेल्या पाच दशकांपासून अमिताभ बच्चन प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. या पाच दशकांमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. एज इज जस्ट अ नंबर हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Amitabh Bachchan Upcoming Movies)
1. 'गणपत : अ हिरो इज बॉर्न' (Ganapath)
अमिताभ बच्चन यांचा 'गणपत : अ हिरो इज बॉर्न' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ते टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'गणपत' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून यातील बिग बींच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'गणपत' हा सिनेमा 20 ऑक्टोबर 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
2. 'कल्कि 2898 AD' (Kalki 2898 AD)
'गणपत : अ हिरो इज बॉर्न' या सिनेमानंतर अमिताभ बच्चन यांचा 'कल्कि 2898 AD' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. या मल्टीस्टारर सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
3. सेक्शन 84 (Section 84)
अमिताभ बच्चन स्टारर 'सेक्शन 84' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोर्टरुम ड्रामा असणाऱ्या या सिनेमात डायना पेंटी, निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिभू दासगुप्ता यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
View this post on Instagram
4. तेरा यार हूँ मैं (Tera Yaar Hoon Main)
बिग बी यांच्या आगामी सिनेमांत 'तेरा यार हूँ मैं' या सिनेमाचा समावेश आहे. टी तमिलवनन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या