Amitabh Bachchan Birthday : अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस! मध्यरात्री 'जलसा'बाहेर चाहत्यांची गर्दी; बिग बींनी केला शुभेच्छांचा स्वीकार
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे.
Amitabh Bachchan : हिंदी सिनेसृष्टीचा डॉन अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे. अमिताभ यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा (Jalsa) निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला. यावेळी स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले.
जलसामधून बाहेर आले अन् शुभेच्छांचा केला स्वीकार
अमिताभ बच्चन आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जलसाबाहेर मोठी गर्दी केली होती. बिग बी मध्यरात्री जलसामधून बाहेर आले आणि चाहत्यांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. बिग बींना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
View this post on Instagram
केक, गुलाब पुष्प अन् बरचं काही...
अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या बंगल्याच्या बाहेर हजारोच्या संख्येने चाहते उपस्थित राहून अभिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. अनेकांनी अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांमध्ये साकारलेली वेशभूषा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. काही चाहते अमिताभ बच्चन यांच्यासाठी केक, गुलाब पुष्प घेऊन आले होते.
बिग बी चाहत्यांच्या आग्रहाखातर नेहमीप्रमाणे 'जलसा' बंगल्याच्या गेटवर आले. चाहत्यांना हात वारे केले आणि पुन्हा 'जलसा' या निवासस्थानी ते रवाना झाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज ते 81 वर्षांचे झाले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह आहे.
अमिताभ बच्चन दरवर्षी न चुकता वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेटत असतात. यंदाची त्यांची 'जलसा'मधून बाहेर येत चाहत्यांची भेट घेतली आहे. चाहत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बी हसतमुखाने 'जलसा'मधून बाहेर आल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकाने आपल्या शैलीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संबंधित बातम्या