Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त 'KBC 15'ने दिलं खास सरप्राईज; बिग बी म्हणाले,"आणखी किती रडवणार"
Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती 15' तर्फे अमिताभ बच्चन यांना खास भेट देण्यात आली आहे.
![Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त 'KBC 15'ने दिलं खास सरप्राईज; बिग बी म्हणाले, Amitabh Bachchan Birthday Kaun Banega Crorepati 15 Amitabh Bachchan cries seeing surprises for him on 81st birthday in kaun banega crorepati 15 Television Entertainment Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त 'KBC 15'ने दिलं खास सरप्राईज; बिग बी म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/fcef9017ee857c50dc1d38b929182bbc1696908686559254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. आता 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) तर्फे त्यांना वाढदिवसाची खास भेट देण्यात आली आहे. बिग बी 11 ऑक्टोबरला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 'केबीसी 15' (KBC 15) तर्फे त्यांच्या वाढदिवसाचं खास आयोजन करण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन नुकतेच 'केबीसी'च्या सेटवर पोहोचले त्यावेळी त्यांना एक सरप्राइज मिळालं. हे खास सरप्राइज पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. निर्मात्यांनी 'कौन बनेगा करोडपती 15'च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बींना अश्रू अनावर झालेले दिसत आहेत.
आणखी किती रडवणार आहात? : अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन म्हणत आहेत,"आणखी किती रडवणार आहात मला? मी लोकांना टिशू देत असतो आज मला टिशूची गरज भासली आहे. या मंचावरील माझा वाढदिवस खूप खास आहे या सरप्राइजसाठी केबीसी टीमचे खूप खूप आभार".
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस खूपच खास असणार आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक सरप्राइज मिळणार आहेत. चिरंजीवी, विकी कौशल, विद्या बालन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि आर.माधवन या कलाकारांनी खास अंदाजात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'कौन बनेगा करोडपती 15'च्या मंचावर या शुभेच्छांचं खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच त्यांचा प्रोजेक्ट के हा चित्रपट रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी 'प्रोजेक्ट के' असं लिहिलेली हुडी परिधान केलेली दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'प्रोजेक्ट के' या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'सेक्शन 84' या चित्रपटात देखील अमिताभ बच्चन काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या
Amitabh Bachchan : तालिबानकडून बिग बींचं कौतुक; यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही केलेला अमिताभ बच्चन यांचा गौरव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)