एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Birthday : 79 वर्षांचे झाले बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan, सोशल मीडियावर कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा

Amitabh Bachchan Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज 79 वर्षांचे झाले आहेत. या खास दिवशी बॉलिवूडच्या कलाकारांनी त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Amitabh Bachchan Birthday : आज 11 ऑक्टोबरला बिग बी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. एकीकडे बच्चन कुटुंबिय वाढदिवसाची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे कलाकार मंडळी सोशल मीडियावर अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत. दरम्यान अजय देवगन (Ajay Devgan) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh)ने खास संदेश लिहिला आहे. 

अजय देवगनने दिल्या बिग बींना शुभेच्छा
अजय देवगन ने बिग बी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे, "सर, तुम्हाला बघत मी एक खरा अभिनेता कसा असतो ते शिकलो आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा अमित जी"

सुनील शेट्टीने दिल्या शुभेच्छा
सुनील शेट्टीने लिहिले आहे, "मिस्टर बच्चन जिथे उभे राहतात तिथून सगळ्या लाईन सुरू होतात. तुम्ही मला कायम त्या लाईनमध्ये बघाल."

शत्रुघ्न सिन्हाने शुभेच्छा देत म्हणाले...
अमिताभ बच्चन यांचे खास मित्र शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिले आहे,"एक खूप चांगला मित्र, राष्ट्रीय आयकॉन, त्यांच्यासारखे तेच असलेले अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देशाचे लाडके असणारे तुमचे वय वाढत राहुदेत". 

रकुल प्रीत सिंहने दिल्या शुभेच्छा
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने लिहिले आहे, "वाढदिवसाच्या शुभेच्छा सर! तुम्हाला खूप सारा आनंद मिळू दे, चांगले आरोग्य लाभू दे. तुम्ही एक प्रेरणा आहात. तुमच्या सोबत काम करता आले त्याबद्दल आभार". 

इमरान हाशमीने शुभेच्छा देत म्हटले, 
अमिताभ सोबत नुकताच काम केलेला इमरान हाशमीने लिहिले आहे, हॅपी 79. तुमचा जोश कायम राहू दे . मला नेहमीच प्रेरणा दिल्याबद्दल आभार. शुभेच्छा".

कमला पसंती जाहिरातीमुळे लोक करत होते बिगबींना ट्रोल
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कमला पसंद या जाहिरातीवरून एका नेटकऱ्याने कमेंट करून ट्रोल केले. त्या यूजरने कमेंट केली, 'नमस्कार सर, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. कमला पसंत पान मसाला जाहिरातीमध्ये काम करण्याची काय गरज होती?' या कमेंटवर अमिताभ यांनी उत्तर दिले, 'नमस्कार, कोणत्याही व्यवसायामध्ये जर कोणाचे चांगले होत असेल, तर असा विचार करू नये की आपण त्यामध्ये का काम करावे. व्यवसायात फक्त कामाचा विचार केला जातो. तुम्हाला वाटते की मी हे काम केले नाही पाहिजे पण  हे काम करून  मला तर पैसे मिळतातच पण आमच्या कामामध्ये जे कर्मचारी आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांना देखील काम आणि पैसे मिळतात.'

अमिताभ बच्चनचे आगामी सिनेमे
अमिताभ बच्चनचे अनेक सिनेमे सध्या पाइपलाईनमध्ये आहेत. अमिताभ आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रम्हास्त्र चित्रपटातून भेटीला येणार आहे. अजय देवगनचा 'मईडे' तर रकुल प्रीत सिंह आणि नागराज मंजुळेच्या 'झुंड' चित्रपटातून अमिताभ भेटीला येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget