Allu Arjun: फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण; हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ
Allu Arjun: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यानंतर अल्लू अल्लून हा हैदराबादमध्ये आला. हैदराबादमध्ये चाहत्यांनी अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत केलं.
Allu Arjun: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा सध्या चर्चेत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नाव कोरलं आहे. काल (17 ऑक्टोबर) नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात द्रौपदी मुर्मूंच्या (Droupadi Murmu) हस्ते अल्लू अर्जुनला पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यानंतर अल्लू अल्लून हा हैदराबादमध्ये आला. हैदराबादमध्ये चाहत्यांनी अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत केलं.
सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की, चाहत्यांनी अल्लू अर्जुनचं हैदराबादमध्ये जंगी स्वागत केलं आहे. चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आणि फुलांची उधळण करुन अल्लू अर्जुनचं हैदराबादमध्ये स्वागत केलं.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अल्लू अर्जुनला (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' ( Pushpa: The Rise) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. अल्लू अर्जुननं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
'पुष्पा: द राइज' या चित्रपटामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटामधील गाणी आणि या चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटामधील ऊ अंटवा, सामी सामी, श्रीवल्ली या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला.
आता 'पुष्पा: द राइज' या चित्रपटानंतर 'पुष्पा: द रूल' (Pushpa The Rule) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 15 ऑगस्ट 2024 रोजी पुष्पा: द रूल हा चित्रपट रिलीज होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: