Allu Arjun : 'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' सिनेमाने IMDB च्या शर्यतीत मारली बाजी; जाणून घ्या 'टॉप 10' सिनेमांची यादी...
Vedam : अल्लू अर्जुनचा 'वेदम' हा सिनेमा IMDB वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय सिनेमा ठरला आहे.
![Allu Arjun : 'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' सिनेमाने IMDB च्या शर्यतीत मारली बाजी; जाणून घ्या 'टॉप 10' सिनेमांची यादी... Allu Arjun Birthday Not Pushpa Vedam film is the highest rated movie of the actor on IMDb rating Allu Arjun : 'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' सिनेमाने IMDB च्या शर्यतीत मारली बाजी; जाणून घ्या 'टॉप 10' सिनेमांची यादी...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/06/947af9704a7f44e6d5fe3681b21e00eb1680774181755254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Allu Arjun IMDB Rating Top 10 Movies : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. जगभरात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. प्रेक्षक कोणता सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत हे आयएमडीबी (IMDB) जाहीर करत असतं. येत्या 8 एप्रिलला अल्लू अर्जुनचा वाढदिवस (Allu Arjun Birthday) असून आयएमडीबीने अल्लू अर्जुनच्या 'टॉप 10' (Top 10) सिनेमांची यादी जाहीर केली आहे.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' (Pushpa The Rise) हा सिनेमा 'आयएमडीबी'च्या शर्यतीत मागे पडला आहे. हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर असून या सिनेमाला 7.6 रेटिंग मिळाले आहे. तर त्याच्या 'वेदम' (Vedam) या सिनेमाने आयएमडीबीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे. आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना 'पुष्पा : द रूल' या सिनेमाची उत्सुकता आहे.
अल्लू अर्जुनचे बहुचर्चित 'टॉप 10' सिनेमे जाणून घ्या...
वेदम (Vedam) : अल्लू अर्जुनच्या 'वेदम' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात अल्लू अर्जुनने राजूची भूमिका साकारली होती. एका मध्यमवर्गीय राजूची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आयएमडीबीच्या शर्यतीत हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.
आर्य (Arya) : आर्य सुकुमार दिग्दर्शित 'आर्य' या सिनेमाची अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. हा रोमॅंटिक सिनेमा 2004 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून या सिनेमाला 7.8 रेटिंग मिळाले आहेत.
पुष्पा द राइज (Pushpa The Rise) : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. या सिनेमाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. आयएमडीबीमध्ये हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर असून या सिनेमाला 7.6 रेटिंग मिळाले आहे.
आर्य 2 (Arya 2) : अल्लू अर्जुनचा 'आर्य' सिनेमा आवडल्यानंतर चाहते 'आर्य 2'ची प्रतीक्षा करत होते. 'आर्य 2'लादेखील सिनेरसिकांनी पसंती दर्शवली आहे. या सिनेमाला 7.4 रेटिंग मिळाले आहेत.
आला वैकुंठपुरमुलु (Ala Vaikunthapurramuloo) : अल्लू अर्जुनच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत 'आला वैकुंठपुरमुलु' या सिनेमाचा समावेश आहे. 2020 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश आलं आहे. आयएमडीबीच्या रेटिंगमध्ये या सिनेमाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सिनेमाला 7.3 रेटिंग मिळाले आहे.
जुलायी (Julayi) : 'जुलायी' या सिनेमातील अल्लू अर्जुनचा अॅक्शनमोड चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमाला 7.2 रेटिंग मिळाले आहे.
रेस गुर्रम (Race Gurram) : 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'रेस गुर्रम' या सिनेमात अल्लू अर्जुने लकी प्रसादची भूमिका साकारली होती. दोन वेगळ्या स्वभावाच्या भावांवर भाष्य करणारा हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.
परुगु (Parugu) : अल्लू अर्जुनचा 'परुगु' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर असून या सिनेमाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.
हॅपी (Happy) : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बोलबाला असलेल्या अल्लू अर्जुनचा 'हॅपी' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता आयएमडीबीमध्ये या सिनेमाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.
S/O सत्यमूर्ती (S/0) Satyamurthy : 'S/O सत्यमूर्ती' हा नाट्यमय सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आयएमडीबीच्या शर्यतीत हा सिनेमा दहाव्या क्रमांकावर असून या सिनेमाला 7 रेटिंग मिळाले आहेत.
संबंधित बातम्या
Pushpa 2: तुरुंगातून पुष्पा झालाय फरार; पुष्पा-2 ची घोषणा करत निर्मात्यांनी शेअर केला थरारक व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)