एक्स्प्लोर
Nana Patole : राज ठाकरेंबाबत काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड निर्णय घेणार - नाना पटोले
काँग्रेसचे (Congress) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal), माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या (MVA) राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. 'मविआचे नेते राज ठाकरेंबाबत दिल्लीला प्रस्ताव पाठवतील आणि हायकमांडकडून निरोप आल्यानंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत निर्णय घेतील', असे मोठे विधान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सपकाळ यांनी राज ठाकरेंच्या संभाव्य प्रवेशाला विरोध दर्शवला असतानाच पटोले यांनी हे वक्तव्य केल्याने काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत. सदोष मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतल्यापासून त्यांच्या मविआ प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पटोले यांच्या विधानामुळे आता या चर्चांना नवे वळण मिळाले असून, अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















