Alia Bhatt : चौदहवीं का चाँद... अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भटचा जलवा, 160 वर्ष जुन्या साडीत खुललं सौंदर्य
Alia Bhatt Look : अनंत-राधिकाच्या शाही विवाहसोहळ्यात सर्व बॉलिवूड स्टार्सची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी आलिया भटच्या साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhik Merchant) यांचा 12 जुलै रोजी विवाह झाला. अत्यंत शाही थाटात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला सर्वच स्टार्सची हजेरी पाहायला मिळाली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याच्या ग्लॅमरमध्ये भर पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhatt) साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनंत-राधिकाच्या लग्नात अभिनेत्री आलिया भटने 160 वर्षे जुनी साडी नेसली होती. आलिया भटचा हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भटचा जलवा
अभिनेत्री आलिया भटने अनंत-राधिकाच्या लग्नात 160 वर्ष जुनी साडी नेसली होती. अनंत-राधिकाच्या लग्नात सर्वांच्या नजरा आलिया भटवर खिळल्याचं पाहायला मिळालं. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये आलियाचं सौंदर्य अतिशय खुललं होतं. या गुलाबी साडीसोबत आलियाने स्ट्रॅपलेस ब्लाऊज घातलं होतं. यासोबतच हेवी नेकलेस आणि इअररिंग्ससह बिंदी आणि स्लीक बन हेअरस्टाईलमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
160 वर्ष जुन्या साडीत खुललं सौंदर्य
आलिया भटचं लेटेस्ट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या खास प्रसंगी आलियाने अतिशय खास साडीची निवड केल्याचं पाहायला मिळालं. आलिया भट्टने या साडीतील काही फोटो शेअर केले. तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिची ही साडी 100 वर्षांहून जुनी आहे.
View this post on Instagram
अंबानींच्या लग्नात आलिया भटवर नजरा
आलिया भटने फुशिया गुलाबी रंगाच्या साडीसह सुंदर सोनेरी रंगाचा हाताने भरतकाम केलेला स्ट्रॅपलेस ब्लाउज घातला होता. आलियाने प्युअर सिल्क आणि जरी बॉर्डरने जडलेली साडी नेसली होती. ही साडी 160 वर्षे जुनी असून खास गुजरातमध्ये बनवण्यात आली होती. ही साडी मनीष मल्होत्राच्या प्रतिष्ठित Archival Weave कलेक्शनमधील असल्याचं समोर आलं आहे. अनंत अंबानींच्या लग्नात आलिया भट्टचा रॉयल लूक पाहायला मिळाला. डाएट सब्यानुसार, गुजरातमध्ये बनवलेली ही 160 वर्षे जुनी साडी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :