Neetu Kapoor : 'तू माझ्या सुनेच्या मागे का लागलाय?'; फोटोग्राफरच्या प्रश्नावर भडकल्या नीतू कपूर
Neetu Kapoor : व्हिडीओमध्ये एक फोटोग्राफर नीतू यांना त्यांच्या सूनेबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.
Neetu Kapoor : बॉलिवूडमधील क्यूट कपल अशी ओळख असलेल्या रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच अगदी साध्या पद्धतीनं रणबीर आणि आलियाचा लग्नसोहळा पार पडला. सध्या अभिनेत्री नीतू कपूर यांना फोटोग्राफर्स त्यांच्या सूनेबद्दल प्रश्न विचारत आहेत. नीतू कपूर यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक फोटोग्राफर नीतू यांना त्यांच्या सूनेबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.
नीतू कपूर सध्या 'डान्स दीवाने ज्युनियर्स' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या शोमध्ये नीतू या परिक्षकाची भूमिक साकारतात. या कार्यक्रमाच्या सेटवर नुकतच नीतू यांना स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्या फोटोग्राफर्सला 'जुग जुग जियो... असं म्हणताना दिसत आहेत.' यावेळी एक फोटोग्राफर नीतू कपूर यांना विचारतो, 'मॅम जुग जुग जियो चित्रपटामध्ये कियारा ही तुमची सून झाली आहे. तिचा एक चित्रपट रिलीज होतोय.' हे ऐकताच नीतू त्या फोटोग्राफरवर भडकतात. त्या म्हणतात, 'तू माझ्या सुनेच्या मागे का लागलाय?' यावर फोटोग्राफर म्हणतो, 'मला तुमची सून चांगली वाटते.'
आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळा 14 एप्रिल रोजी पार पडला. दोघांच्या लग्नसोहळ्याला मोजक्या पाहूण्यांनी हजेरी लावली होती. एका मुलाखतीमध्ये नीतू कपूर यांनी प्रश्न विचारण्यात आला की, 'आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळ्या साध्या पद्धतीनं का पार पडला?' यावर नीतू यांनी उत्तर दिलं, 'आम्हाला सर्कस सारखा विवाह सोहळा नको होता. आम्हाला याबाबत कोणालाही सांगायचे नव्हते. आम्ही शॉपिंग देखील केली नाही. काही लोकांना आम्ही काम करण्यास सांगितलं कारण जर आम्ही बाहेर गेलो असतो तर सर्वांना समजले असते की लवकर लग्न होणार आहे. जेव्हा सब्यसाचे आऊटफिट आले तेव्हा सगळ्यांना कळाले. '
नीतू कपूर या लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या 'जुग जुग जियो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी, वरुण धवन, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी हे कलाकार प्रमुख बूमिका साकारणार आहेत.
हेही वाचा :
- Superhit Bollywood Stars : दीपिका पदुकोण ते शाहरुख खान, ‘या’ कलाकारांना पहिल्याच चित्रपटाने रातोरात बनवले स्टार!
- Chhavi Mittal Post : कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पहिल्यांदाच छवी जिममध्ये, फोटो शेअर करत म्हणाली...
- Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!