Alia Bhatt first met Ranbir Kapoor : वयाच्या 11 व्या वर्षी बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत झाली आलियाची पहिली भेट
आलिया भट्ट (Alia Bhatt) पहिल्यांदा रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) संजय लीला भन्साळी यांच्या सेटवरच भेटली होती. त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती. आलियानेच एका मुलाखतीत या भेटीबद्दल सांगितले आहे.
Alia Bhatt first met Ranbir Kapoor : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. परंतु, या दोघांची पहिली भेट कोठे झाली? याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. आलियानेच एका मुलाखतीत या भेटीबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्यासमोरच सुरू झाली हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, अनेकांना ही गोष्ट माहीत नाही की, दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आणि आलिया भट्ट यांचीही प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्यासमोरच सुरू झाली होती. आलिया पहिल्यांदा रणबीर कपूरला संजय लीला भन्साळी यांच्या सेटवरच भेटली होती. त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती.
आलियाच्या मुलाखतीची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत आलिया भट्टने सांगितले आहे की, ती ब्लॅकच्या सेटवर रणबीर कपूरला पहिल्यांदा भेटली त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती. पण तरीही रणबीर कपूरसमोर आलिया खूप लाजली होती. तिने स्वत: याबाबत सांगितले आहे.
आलिया तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित होत आहे. तर दुसरीकडे तिचे रणबीर कपूरसोबतचे नाते देखील चर्चेचा भाग बनले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ranbir Kapoor, Alia Bhatt : आलिया म्हणाली, 'रणबीरची इमेज थोडी खराब झाली पण..'
- Alia Bhatt : 'गंगूबाई काठियावाडी'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आलिया घाबरली ; सांगितला अनुभव, म्हणाली...
- Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!
- Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत