एक्स्प्लोर

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

अर्शदीपने फिल्मीस्टाईलने गुडघ्यावर बसून समरीनच्या बोटात अंगठी घातली, सध्या या जोडीच्या हटके आणि सिनेस्टाईल अंदाजाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मुंबई : एकीकडे देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) धमाका केलाय. नुकतेच झालेल्या ट्रेड डीलमध्ये अर्शदीपने पंजाबची साथ सोडून मुंबई इंडियन्ससोबत (MI) आयपीएलसाठी साठगाठ बांधली आहे. मात्र, अर्शदीपने आता आयुष्याची देखील लग्नगाठ बांधल्याचं दिसून आलं. अर्शदीपने बुधवार 11 नोव्हेंबर रोजी त्याची मैत्रीण समरीनसोबत साखरपुडा केला असून त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   

अर्शदीपने फिल्मीस्टाईलने गुडघ्यावर बसून समरीनच्या बोटात अंगठी घातली, सध्या या जोडीच्या हटके आणि सिनेस्टाईल अंदाजाचे फोटो व्हायरल झाले आहेत. मुंबई इंडियन्सनेही अर्शदीप-समरीनच्या जोडीचे फोटो शेअर करत, अर्शदीपसाठी आजची तारीख 11-11-27 ही खरंच खास आहे. अभिनंदन अर्शदीप आणि समीरन... असे एमआयने ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे. दरम्यान, अर्शदीप आणि समरीनला चाहत्यांकडून शुभेच्छाद दिल्या जात आहेत. तर, क्रिकेट क्षेत्रातील मित्रमंडळी आणि दिग्गजांकडूनही दोघांचे अभिनंदन केले जात आहे. 

अर्शदीप आणि समरीन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले की, ‘आयुष्य जे काही देऊ शकतं, त्यापैकी सर्वात मोठा आनंद याच गोष्टीचा आहे की, त्याने आपल्याला एकमेकांची साथ दिली. आयुष्यभराच्या या सहप्रवासाच्या नावाने... ११.११.२०२६ (हॅपी एंगेजमेंट!).’ अशी इंस्टा पोस्ट अर्शदीपने केली आहे. दरम्यान, अर्शदीप आणि समरीन दोघेही गेल्या काही वर्षांपासून चांगले मित्र आहेत, समरीन ही पंजाबी सिनेक्षेत्रात असून ती अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसून आली आहे. बॉलिवूडच्या '83' या कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारीत 1983 च्या वर्ल्डकपाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमातही ती झळकली होती.

हेही वाचा

र्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya and Arshdeep Singh Trade: मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Aaryavir Sehwag Century : पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
IND vs NZ 4th ODI : तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Embed widget