एक्स्प्लोर

Alia Bhatt and Sharvari In YRF Spy Universe : 'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार, चित्रपटाचे नावही ठरलं

Alia Bhatt and Sharvari In YRF Spy Universe : आलिया भट ही यशराजच्या स्पाय युनिव्हर्स मधील पहिली फिमेल लीड अॅक्ट्रेस आहे. आता तिच्या सोबत आता YRF ची होमग्रोन टॅलेंट शर्वरी वाघही दिसणार आहे.

Alia Bhatt and Sharvari In YRF Spy Universe :  बॉलिवूडमध्ये 'यशराज फिल्मस'ची (YRF) स्पाय युनिव्हर्स (SPY Universe) सीरिज सुरू केली आहे. या स्पाय युनिव्हर्समध्ये अभिनेत्यानंतर आता अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट ही यशराजच्या स्पाय युनिव्हर्स मधील पहिली फिमेल लीड अॅक्ट्रेस आहे. आता तिच्या सोबत आता YRF ची होमग्रोन टॅलेंट शर्वरी वाघही दिसणार आहे. या दोघीही स्पाय युनिव्हर्समध्ये एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. आदित्य चोप्रा या दोन्ही अभिनेत्रींना स्पाय युनिव्हर्सच्या अल्फा गर्ल बनवण्यास तयार आहे. 

आलिया भट्ट आणि शर्वरी स्पाय युनिव्हर्स

'यशराज फिल्म्स'ने चित्रपटाच्या नावासह पहिला व्हिडिओ देखील रिव्हिल केला आहे. या व्हिडिओत आलिया भटचा आवाज ऐकू येत आहे. 'अल्फा'चा पहिला व्हिडिओ समोर येताच तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. केवळ पुरुषच अल्फा असू शकतात हा समाजातील गैरसमज मोडून काढण्यासाठी YRF ने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ देशाच्या शत्रूंशी लढताना दिसणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

स्पाय युनिव्हर्सच्या टायटल अनाउंसमेंट व्हिडीओत  आलिया भटने म्हणते की, ग्रीक वर्णमालेचे पहिले अक्षर आणि आमच्या कार्यक्रमाचे बोधवाक्य... प्रथम, सर्वात वेगवान, धाडसी. जर तुम्ही नीट पाहिले तर प्रत्येक शहरात जंगल आहे आणि अल्फा नेहमीच जंगलात राज्य करेल.

अॅक्शनपट असणार 'अल्फा'

आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्सचा पहिला फीमेल लीड चित्रपट धमाकेदार असावा याची काळजी घेत आहेत. या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन असणार आहेत. 'अल्फा'चे दिग्दर्शन शिव रावल करत आहेत. शिव यांनी यशराज फिल्म्स निर्मित 'द रेल्वे मेन' या ब्लॉकबस्टर ग्लोबल स्ट्रीमिंग मालिकेचेही दिग्दर्शन केले होते. निर्माता आदित्य चोप्रा निर्मित YRF Spy Universe हा आज भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा IP बनला आहे. या गुप्तहेर विश्वाचे सर्व चित्रपट - 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार', 'पठाण', 'टायगर 3' ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

यशराजचा स्पाय युनिव्हर्सचा धडाका

 आलिया आणि शर्वरीची मुख्य भूमिका असलेला अल्फा हा आदित्य चोप्रा यांचा पुढील मोठा महत्त्वाचा चित्रपट आहे. सध्या यशराज फिल्मसकडून वॉर 2 ची निर्मिती  केली जात आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यानंतर 'पठाण -2' आणि  त्यानंतर 'टायगर vs पठाण' हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील.

YRF च्या  स्पाय युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटांची यादी 

YRF च्या स्पाय युनिव्हर्सची  सुरुवात सलमान खानच्या 'एक था टायगर' मधून झाली. त्यानंतर 'टायगर जिंदा है' आणि हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या 'पठाण'ची या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' प्रदर्शित झाला. आता या फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट 'वॉर 2' आहे. अयान मुखर्जी याचे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये हृतिक रोशन, जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget