Akshaya Hardeek Wedding : राणादा आणि पाठक बाईंचा जीव एकमेकांत गुंतला, सप्तपदी घेत सुखी संसाराची सुरुवात
Akshaya Hardeek Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
Akshaya Hardeek Wedding : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.
नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा पाठकबाईंचा नववधू साज आहे. तर नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला आहे. अक्षयाने तिच्या मेहंदीत सप्तपदीची डिझाइन काढली आहे. दोघांनी पारंपरिक पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. अक्षया व हार्दिकचा हा लूक चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
अक्षया-हार्दिकने 3 मे 2022 रोजी साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांचेही केळवण, मेहंदी, संगीत आणि हदळीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
एकमेकांशी असलेलं स्पेशल नातं सोशल मीडियावर जगजाहीर केल्यापासून हार्दिक आणि अक्षया एकमेकांसोबत बराच वेळ एकत्र घालवताना दिसत असतात. तसंच ते एकमेकांसोबत घालवलेले काही खास क्षण सोशल मीडियावर सुद्धा शेअर करत असतात.
राणादा-पाठकबाईंची लव्हस्टोरी
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेदरम्यान राणादा आणि पाठकबाई पाच वर्ष एकमेकांसोबत काम करत होते. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. एका कार्यक्रमादरम्यान हार्दिक म्हणाला,"माझ्या डोक्यात असा कधी विचार नव्हता पण माझी आई सारखी तिला विचारायची हे मला नंतर कळलं. आई तिला सांगायची की मला तू आवडतेस. मला आई म्हणालेली की आता मालिका संपलेय, मग तू दुसरी कोणती तरी मालिका घेशील, चित्रपट करशील, त्यामुळे आता घरात आहेस तर लग्नाचा विचार आधी कर. तुझं वय निघत चाललं आहे".
हार्दिक पुढे म्हणाला,"माझी आई मला म्हणाली की, 'तू तिच्याशी बोलून बघ, मी आधी एकदा तिला विचारलं आहे. मी तिला म्हटलं की ती जेवढं माझ्याशी बोलते ना तेही बंद करेल. तरी ती म्हणाली की एकदा बोलून बघ. मी माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी आईसाठी करतो. त्यामुळे मी ठरवलं की एकदा बोलून बघूया. तेव्हा मी अक्षयाशी बोललो की माझ्या आईची इच्छा आहे आपल्या दोघांचं लग्न व्हावं. तेव्हा ती म्हणाली की मला काही समस्या नाही, फक्त तू एकदा घरी येऊन बोल.'
संबंधित बातम्या