Welcome to the Jungle Teaser: अक्षय कुमारनं वाढदिवसाला दिलं चाहत्यांना खास गिफ्ट; शेअर केला 'वेलकम टू द जंगल'चा मजेशीर टीझर
अक्षय कुमारनं (Akshay Kumar) 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) या चित्रपटाचा मजेशीर टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
![Welcome to the Jungle Teaser: अक्षय कुमारनं वाढदिवसाला दिलं चाहत्यांना खास गिफ्ट; शेअर केला 'वेलकम टू द जंगल'चा मजेशीर टीझर Akshay Kumar unveils hilarious Welcome to the Jungle teaser share on social media Welcome to the Jungle Teaser: अक्षय कुमारनं वाढदिवसाला दिलं चाहत्यांना खास गिफ्ट; शेअर केला 'वेलकम टू द जंगल'चा मजेशीर टीझर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/09/f6c1934ef568eec675cff9cb31e48be71694256193864259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Welcome to the Jungle Teaser: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आज 56 वा वाढदिवस आहे. अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आज अक्षयनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) या चित्रपटाचा मजेशीर टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सोशल मीडियावर शेअर करुन अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी स्वत:ला आणि तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाची भेट देत आहे. तुम्हाला हे आवडल्यास मला धन्यवाद म्हणा, मी याला वेलकम-3 म्हणत आहे.'
'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमारसोबतच संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, इनाम कुमार, कृष्णा अभिषेक. झाकीर हुसेन, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि वृही कोडवारा हे कलाकार देखील दिसत आहेत. 'वेलकम टू द जंगल'मध्ये 24 कलाकार कॅपेला सादर करताना दिसणार आहेत.
पाहा टीझर:
View this post on Instagram
कधी रिलीज होणार चित्रपट?
'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. असून त्याचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. ज्योती देशपांडे आणि फिरोज ए. नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाबरोबरच अक्षयचा 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 6 ऑक्टोबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा दिवंगत जसवंत सिंह गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)