Akshay Kumar : 24 लोकांसोबत एका खोलीत घालवलं बालपण; 100 रुपये घरभाड, नशीब बदलल अन झाला बॉलीवूडचा सुपरस्टार खिलाडी
Akshay Kumar Struggling Days : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार आज आलिशान आयुष्य जगत आहे. पण करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत तो 100 रुपयांच्या भाड्याच्या घरात राहत असे.
Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) सध्या आगामी बडे मिया छोटे मिया या सिनेमामुळे चर्चेत आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रदर्शन करत आहे. खिलाडीकुमारने आज यशाचा रस्ता पार केला असला तरी हा प्रवास त्याच्यासाठी खडतर होता. अक्षय आज आलिशान आयुष्य जगतोय पण करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. सुरुवातीला तो शंभर रुपयांच्या भाड्याच्या घरात राहत असे.
शंभर रुपयाच्या भाड्याच्या घरात राहायचा खिलाडीकुमार
हिंदी मनोरंजन सृष्टीत अक्षत कुमारचे मोठे नाव आहे. १०० रुपयांचे घरभाडं ते महागडी इमारत खरेदी करण्यापर्यंत त्याचा प्रवास सोपा नव्हता. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने आपल्या संघर्षाच्या दिवसांना उजाळादिला आहे. अक्षय कुमार म्हणाला चांदणी चौकात आम्ही २४ जन एका खोलीत राहायचो. त्यावेळी दररोज न चुकता आम्ही सर्व जण व्यायाम करायचो. त्यावेळी व्यायामासाठी पुरेशी जागा देखील नसायची परंतू व्यायाम करणे हा नियमित जीवनाचा भाग झाला असल्याने आम्ही त्याही परिस्थितीत व्यायामाचा दिवस चुकवला नाही. त्यावेळेचे दिवस खरच कमालीचे होते. आज आठवले तरी त्या दिवसांची किमंत भरून निघणारी नाही . त्याकाळातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी आनंददायी होता.
सिनेमाचे तिकीट खरेदी करण्यासाठी अक्षय कुमार वाचवायचा पैसे.
आज अक्षय कुमार याचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपट गृहात चित्रपट पाहायला प्रेक्षक रांगा लावताना आपण पाहतो. मात्र एकेकाळी याच अक्षय कुमार याला चित्रपटांची तिकीट काढण्यासाठी पैसे वाचावयाला लागायचे. वाचलेल्या पैशातून चित्रपट पाहण्याच्या दिवसाची सोनेरी आठवण सांगताना तो भावूक होताना दिसला. अक्षय पुढे म्हणाला, आज पैसा आहे परंतु आपण दुखी असतो त्यावेळी आम्ही डाळभात खाऊनही सुखी होतो. मला आठवतय आम्ही सकाळच जेवण स्किप करायचो आणि त्या वाचलेल्या पैशातून चित्रपट पाहायचो.
बडे मिया छोटे मिया हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार सह टायगर श्रॉफ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे बहुतांशी पूर्ण झाले आहे. दोन महिने या ठिकाणी भव्य सेट उभारण्यात आला होता. या बहुप्रतीक्षित चित्रपटाची अक्षयचा चाहता वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.